“झोलझाल” चित्रपट आला प्रेक्षकांच्या भेटीस

कोविडच्या दोन लसीनंतर हास्याचा एक बूस्टर डोस घेऊन झोलझाल हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे.

“झोलझाल” चित्रपट आला प्रेक्षकांच्या भेटीस

कोविडच्या दोन लसीनंतर हास्याचा एक बूस्टर डोस घेऊन झोलझाल हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे. निर्माते गोपाळ अग्रवाल निर्मित ‘झोलझाल’ हा चित्रपट आज सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी किती रुचकर असणार हे आपण चित्रटातील ठसकेदार गाण्यांनी आणि चित्रपटाचा ट्रेलरने पहिलाच आहे,  झोलझाल या चित्रपटात तब्बल २२ कलाकारांनी मिळून जो काय गोंधळ घातलाय तो खरंच पाहण्यासारखा आहे. एका महालाभोवती फिरणारी या चित्रपटाची कथा तो महल मिळवण्यासाठी कोण काय काय आणि कसे कसे झोलझाल करतय हे चित्रपट

‘झोलझाल’ चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. हास्याची कारंजे घेऊन हे कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला चित्रपटगृहात आले आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला असून वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे या फेमस गायकांच्या स्वरात स्वरबद्ध केलेली गाणी थ्रीकायला खरच भाग पाडतायत. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, उदय टिकेकर, सयाजी शिंदे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, उदय नेने, अंकुर वाधवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार असून या कलाकारांच्या भूमिका चित्रपटांत निव्वळ पर्वणीच ठरल्या आहेत. तब्बल २२ कलाकारांनी एकत्र येऊन या चित्रपटात नेमका काय धिंगाणा घातलाय हे आजपासून मोठ्या पडद्यावर पाहणे नक्कीच रंजक ठरेल.

दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू पेलवली आहे. तर चित्रपटाची निर्मिती निर्माते गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली. तर चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून सारिका गुप्ता आणि स्वप्निल गुप्ता यांनी बाजू सांभाळली. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे. माननीय अमेय खोपकरजी हे चित्रपटाचे वितरक म्हणून जबाबदारी पेलवत आहेत.निर्माते गोपाळ अग्रवाल निर्मित ‘झोलझाल’ हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे

Exit mobile version