कब्जा सिनेमाचा ट्रेलर रिलीज , बिग बी नि सुद्धा सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करत शुभेच्छा दिल्या

कताच काही तासांपूर्वी कब्जा ह्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे . ह्या ट्रेलर मध्ये आपल्याला उपेंद्र आणि किच्चा ह्यांची जोडगोळी आपल्याला बघायला मिळाली

कब्जा सिनेमाचा ट्रेलर रिलीज , बिग बी नि सुद्धा सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करत शुभेच्छा दिल्या

नुकताच काही तासांपूर्वी कब्जा ह्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे . ह्या ट्रेलर मध्ये आपल्याला उपेंद्र आणि किच्चा ह्यांची जोडगोळी आपल्याला बघायला मिळाली . हा चित्रपट भरपूर एक्शन आणि इमोशन ने भरलेला असणार आहे ह्या ट्रेलर वरून समजून येत आहे, कब्जा हा सिनेमा हा आनंद पंडित ह्यांचे सिनेसृष्टीतील पहिले पॉल आहे. त्यामुळे काय नवीन बघायला मिळणार ह्याची लोकांना उत्कंठा आहे.

हिंदी सिने सृष्टीतील मोठं नाव म्हणजे अमिताभ बच्चन ह्यांनीदेखी हा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वरून सहारे करत सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. हा ट्रेलर शेअर करताना त्यांनी लिहिला आहे कि कब्जा ह्या सिनेमाचा ट्रेलर शेअर करताना मला खुप आनंद होत आहे. माझ्या अत्यंत जवळच्या मित्राने ह्याची निर्मिती केली आहे. तसेच सर्व कलाकारांना शुभेच्छा. लोकांनी ट्रेलर बघून लगेच कब्जा ह्या सिनेमाची तुलना अत्यंत गाजलेल्या KGF2 सोबत केली आहे.

कब्जा सिनेमाची रिलीज डेट –
कब्जा हा सिनेमा हा आनंद पंडित ह्यांचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पहिले पाऊल आहे, ह्यासिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आर चंद्रने सांभाळली आहे.हा सिनेमा १७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .हिंदी,मल्याळम ,तेलगू,तामिळ कन्नड अशा पाच भाषांमध्ये तो रिलीज होणार आहे. नेमका त्याच दिवशी कापली शर्मा ह्यांचा ‘ज्विगाटो’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे ,त्यामुळे पुन्हा एकदा हिंदी सिनेमा आणि दाक्षिणात्य सिनेमा असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. आता ह्या लढाईत ह्या वेळी कोण बाजी मारताय हे बघण्यासारख ठरेल. दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपसह श्रिया सरनदेखील ‘कब्जा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या पॅन इंडिया सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. ‘पठाण’नंतर पुन्हा एकदा हा सिनेमा मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस दाखवेल. किच्चा सुदीपचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. तसेच पाच भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होत असल्याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल.

हे ही वाचा :

Sandeep Deshpande घेणार आज पत्रकार परिषद, हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग तर २ जण ताब्यात

मराठवाड्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version