Kangana Ranaut ती परत आली आहे, कंगनाने केले ट्विटरवर आगमन, ट्विट करून म्हणाली

बॉलीवूडची पंगा क्वीन नेहमी तिच्या वर्तुणुकीमुळे चर्चेत असते. कंगना हि बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्वीन(queen ), तनु वेड्स मनू (tanu weds manu ), हे तिचे चित्रपट सुपरहिट झाले आहेत.

Kangana Ranaut ती परत आली आहे, कंगनाने केले ट्विटरवर आगमन, ट्विट करून म्हणाली

बॉलीवूडची पंगा क्वीन नेहमी तिच्या वर्तुणुकीमुळे चर्चेत असते. कंगना हि बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्वीन(queen ), तनु वेड्स मनू (tanu weds manu ), हे तिचे चित्रपट सुपरहिट झाले आहेत. अशी हि कंगना रनौत तिच्या वक्तव्यामुळे नेहमी वादात असते. बिंदास मनाची आणि लोकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडून जाणारी कंगना ट्विटर अकाउंट वर पुन्हा ऍक्टिव्ह झाली आहे.

 

कंगना रनौतला नेहमी ट्विटवर (twitter ) ट्रोल केले गेले तसेच तिच्या एका ट्विटमुळे व ट्विटरवरील नियमांचे उलंघन केल्याने तिचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले होते. आता तब्बल २० महिन्यांनी तिचे अकाउंट पुन्हा चालू झाले आहे. अकाउंट चालू होताच कंगनाने ट्विट केले आहे. हॅलो एव्हरीवन, इथे पुन्हा परतून खूप बार वाटतंय (Hello everyone, it’s nice to be back here) असं ट्वीट करत अभिनेत्री कंगना रनौत हिनं आपण ट्वीटरवर परत आल्याचं सांगितलं. त्याच बरोबर कंगना रनौतने दुसरे ट्विट केले आहे. हे ट्विट एक आनंदाची बातमी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. आपलं दुसरं ट्विट करून कंगनाने तिच्या आगामी चित्रपट इमर्जन्सीबद्दल माहिती दिली आहे. कंगना ट्विट करत म्हणते कि, !!!इमर्जन्सीचे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे, २० ऑक्टोबर २०२३ रोजी सिनेमागृहात भेटू’ असे म्हणून तिने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.

कंगनाच्या इमर्जन्सी (Emergency)या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच सर्वत्र त्याची चर्चा चालू होती, आता या चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे, प्रेक्षकांना कंगनाचे काम आवडले आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनीही कंगनाचे अभिनंदन केले आहे. चित्रपत तिने केलेल्या कामाबाबत सिनेसृष्टीत कौतुकास्पद चर्चा होत आहे, अशी माहिती मिळाली आहे. इमर्जन्सी या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतने (kangna rnaut) इंदिरा गांधींची (Indira Gandhi) भूमिका बजावली आहे. तसेच हा चित्रपट तिने स्वतः निर्मित केला असून दिग्दर्शनही कंगना करत आहे. दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती कंगनाने केलेला हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तिने आपली सगळी संपत्ती लावली आहे ,असे देखील कंगनाने सांगितले.

हे ही वाचा:

मोठी बातमी, अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

१८ हजार फूट उंचीवर आणि -४० डिग्री तापमानात उपोषण, सोनम वांगचुकला का करावी लागली पंतप्रधान मोदींकडे याचना?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version