spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी सिनेसृष्टीत अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.चित्रपटातील संवाद,लेखन आणि भाष्य प्रेक्षकांच्या चांगलचं पसंतीस उतरत आहे.

मराठी सिनेसृष्टीत अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.चित्रपटातील संवाद,लेखन आणि भाष्य प्रेक्षकांच्या चांगलचं पसंतीस उतरत आहे.मराठी चित्रपटाला प्रेक्षकवर्ग वाढताना दिसून येत आहे.अशातच आता कन्नी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात अजिंक्य राऊतही दिसत आहे. आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.

दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही  मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही ‘कन्नी’ सर्वांना एकत्र बांधण्यासाठी ८ मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.”दरम्यान प्रेक्षकांमध्ये आता या चित्रपटाबाबतची उस्तुकत्ता आहे.

हे ही वाचा:

‘येथे’ रंगणार महाकाव्य रामायणाचा कार्यक्रम – Sudhir Mungantiwar

त्यांची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची? – Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss