कांतारा चित्रपटातील अभिनेता चेतन अडचणीत : धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप

कांतारा चित्रपटातील अभिनेता चेतन अडचणीत : धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप

सध्या ‘कांतारा’ (Kantara) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला जगभरातून प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे चाहते संपूर्ण जगभरात विखुरलेले आहे त्यामुळे या चित्रपटानं बॉक्स कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटामधील एका सीनबद्दल वक्तव्य केल्यानं आता नुकताच अभिनेता चेतन कुमार अहिंसा (Chetan Kumar Ahimsa) हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे . चेतनवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून अभिनेत्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.


कांतारा या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता चेतन कुमार अहिंसाने कांतारामध्ये दाखवलेल्या ‘भूत कोला’ या परंपरेबाबत आणि चित्रपटातील सीनबद्दल वक्तव्य केले. त्यानंतर चेतन आता वादच्या भोवऱ्यात अडकला आहे. हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे, असं म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तक्रार कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. नुकतेच ANI नं याबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,’कन्नड चित्रपट ‘कंतारा’ मध्ये चित्रित केलेल्या ‘भूत कोला’ च्या परंपरेवर भाष्य करताना “अपमानजनक” विधान केल्याचा आरोप चेतनवर करण्यात आला. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.’

कांतारा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १७ कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटानं १७० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘कांतारा’मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. ‘कांतारा’ हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. अनेक कलाकांनी कांतारा या चित्रपटाचं कौतुक केलं. चित्रपटाचं कन्नड व्हर्जन ब्लॉकबस्टर ठरलं.

IND vs PAK T20 : अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर केली बाबर आझमची शिकार

Xi Jinping : शी जिनपिंग यांची तिसर्‍यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी निवड

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : मान्सून महाराष्ट्रातून अखेर माघारी परतला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version