कांतारा चित्रपटाचा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली

कांतारा चित्रपटाचा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने  मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली

कांतारा चित्रपटाचा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली

आज कांतारा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी मुंबईतील लोकप्रिय सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. तो पांढरा शर्ट आणि डेनिम पॅन्ट परिधान करून आला होता. त्याने पत्काही घातला होता. ऋषभने मंदिरात प्रार्थना केली . त्याने मंदिराबाहेर काही चाहत्यांसोबत फोटोही काढले. ऋषभ शेट्टीचा कांतारा हा जागतिक बॉक्स ऑफिसवर २५० कोटींचा टप्पा पार करणारा तिसरा कन्नड चित्रपट ठरला आहे . त्याची हिंदी आवृत्ती सध्या बॉक्स ऑफिसवर थँक गॉड, राम सेतू आणि ब्लॅक अॅडम सारख्या चित्रपटांना टक्कर देत आहे. एका वृत्तानुसार, हा चित्रपट १५ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. सप्टेंबरमध्ये रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने सार्वत्रिक प्रशंसा मिळवली. रजनीकांत, प्रभास, कंगना रणौत, राम गोपाल वर्मा आणि विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

काही दिवसांपूर्वीच ऋषभने रजनीकांतची भेट घेतली, ज्यांनी कांताराला यश मिळवण्यासाठी सोन्याची चेन दिली. त्यांनी त्यांच्या भेटीची छायाचित्रे शेअर केली आणि ट्विट केले, जर तुम्ही एकदा आमची स्तुती केलीत तर ते आमचे १०० वेळा कौतुक करण्यासारखे आहे. आमचा चित्रपट पाहिल्याबद्दल आणि आमच्या कांतरा चित्रपटाचे कौतुक केल्याबद्दल रजनीकांत सरांचे आभार. तुमचे आभारी राहीन.

“चित्रपटाबद्दल बोलताना ऋषभने सांगितले होते कि , “अभिनय भाग नक्कीच सर्वात कठीण होता. एक्सप्रेशनमुळे नाही तर अॅक्शन सीक्वेन्समुळे. विशेषत: जे दैवा कोला सीक्वेन्स दरम्यान मला ५०-६० किलो वजन उचलावे लागले. त्या भूमिकेसाठी शूटिंगच्या २०-३० दिवस आधी मी मांसाहार सोडला होता.तर दैव कोला भूमिका धारण केल्यावर मी नारळपाण्याशिवाय काहीही पीत नव्हतो .सिन करण्यापूर्वी आणि नंतर ते मला प्रसाद द्यायचे.” त्यांनी असेही स्पष्ट केले की त्याने कांतारा हा चित्रपट संपूर्ण भारतासाठी बनण्याची योजना केली नव्हती . पण आता कांतारा हा चित्रपट भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आघाडीवर आहे.

हे ही वाचा :

महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे – सुषमा अंधारे

गुजरातमध्ये मच्छू नदीत केबल पूल पाण्यात कोसळला; तीनशेहून अधिक नाकरीक पाण्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version