बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांना ‘कांतारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिषभ शेट्टींचा सल्ला

बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांना ‘कांतारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिषभ शेट्टींचा सल्ला

गेल्या दोन वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांना संपूर्ण जगातून भरपूर प्रेम मिळत आहे . हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बॉलीवूड चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करत आहेत . KGF, RRR, Kantara या चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसाचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड मोडला आहे . कांतारा या चित्रपटाचे दिग्दर्शक रिषभ शेट्टी हे सध्या खूप चर्चेत आहेत. हा चित्रपट गावातील रूढी ,परंपरा,लोककथेवर आधारित आहे . तर या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्सऑफिसमध्या सर्वाधिक कमाई केली आहे . या आधी KGF आणि RRR या चित्रपटाने सर्वाधिक कामे केल्याची नोंद होती , त्यामुळे या सगळ्याचा बॉलीवूडला खूप मोठा फटका पडला आहे. बॉलीवूडमधील बहुतांश चित्रपटांना अपयश मिळत आहे.या संदर्भात रिषभ शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रिषभ शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितले कि “जर चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर चित्रपटांमध्ये लोककला, ग्रामीण जीवन यांचा जास्तीत जास्त प्रभाव असायला हवा . रिषभ शेट्टीने सांगितले कि लोकांची आणि लोकांच्या भावनांची काळजी घ्यायला हवी. निर्मात्यांना प्रेक्षकांची मूल्य आणि जगण्याची पद्धत समजून घेण्याची गरज आहे. चित्रपट निर्माता होण्याआधी आपण त्यांना महत्त्व द्यायला हवं.”या मुलाखतीत रिषभ शेट्टी यांनी बॉलीवूडला अपयश का येत आहे हे सांगितलं आणि बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांना आता काय करण्याची आवश्यकता आहे याचाही सल्ला दिला. ऋषभ शेट्टी यांनी सांगितले कि , “हॉलिवूड आणि बाकी गोष्टींमुळे पाश्चिमात्य देशांचा प्रभाव जास्त आहे ,आपण आपल्या देशातही तेच करण्याचा प्रयत्न करतोय. लोकांना आधीपासूनच हॉलिवूडकडून हे सगळं मिळत आहे आणि आपल्या तुलनेत त्यांचा दर्जा आणि सादरीकरणाची पद्धती खूपच उत्तम असेल तर लोक आपले चित्रपट का पाहतील?” असा सवाल रिषभ शेट्टी यांनी विचारला .

रिषभ शेट्टी यांनी पुढे सांगितलं की “ओटीटीवरील पाश्चिमात्य चित्रपट किंवा इतर कंटेन्ट प्रत्येक भाषेत मिळतो. परंतु प्रेक्षकांना रोजच्या आयुष्यांशी जोडल्या जातील अशा कथा मिळत नाहीत.जर त्यांना त्यांच्याच गावातली गोष्ट चित्रपटात किंवा आपण तयार करत असलेल्या कंटेन्टमध्ये मिळत नाही. एक अशी कथा जी प्रेक्षकांच्या प्रदेशाशी, त्याच्या मुळाशी आणि मूल्यांशी जोडलेली असेल . तर ती कथा जगात कुठेही सापडणार नाही. चित्रपट निर्माते हे कथाकार असतात आणि त्यांच्या क्षेत्रात अशा अनेक कथा आहेत.चित्रपट निर्मात्यांना त्याच कथा लोकांपर्यंत पोहोचवता यायला हव्यात.”

हे ही वाचा :

‘…तर गाठ माझ्याशी’, भर पत्रकार परिषदेत संभाजीराजे भडकले, नेमकं काय घडलं?

वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक

भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version