Kantara : ‘कांतारा’ चित्रपटपाहून कंगना झाली इम्प्रेस; केला व्हिडिओ शेअर

अवघ्या १६ कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने हिंदीतही ११ कोटींहून अधिकची कमाई केली आहे.

Kantara : ‘कांतारा’ चित्रपटपाहून कंगना झाली इम्प्रेस; केला व्हिडिओ शेअर

अवघ्या १६ कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने हिंदीतही ११ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. आधी हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, पण नंतर चित्रपटाला मिळालेले अफाट यश पाहून निर्मात्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही त्याचे डबिंग केले. इतर भाषांमध्ये रिलीज झाल्यानंतर ‘कांतारा’च्या कमाईत वाढ झाली आहे. एकीकडे हा चित्रपट मोठया प्रमाणत धुमाकूळ घालत आहे तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही (Kangana Ranaut) ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

व्हिडीओमध्ये पुढे ती म्हणाली की, ‘कांतारामध्ये आपली परंपरा, लोककथा किती छान प्रकारे दाखवल्या आहेत. या चित्रपटातून बाहेर पडायला मला अजून आठवडातरी लागेल. संपूर्ण चित्रपट अप्रतिम आहे. आम्ही असा चित्रपट यापूर्वी कधीच पाहिला नाही, असे म्हणत लोक थिएटरमधून बाहेर पडत होते. या चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीचे खूप खूप आभार.’ व्हिडीओमध्ये कंगनाही खूप भावूक झालेली दिसली, तिचे हावभाव पाहून असे वाटले की, तिला ‘कांतारा’ चित्रपट खूप आवडला आहे.

‘कांतारा’ हा चित्रपट एक अँक्शन थ्रिलर आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टीने लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. ३० सप्टेंबर रोजी रिलीज झाल्यापासून, या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १७० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘कांतारा’मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.

हे ही वाचा : 

Sanjay Raut : खा.संजय राऊतांच्या यंदा दिवाळी फराळ कोठडीतच, अजूनही दिलासा नाहीच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सारथीच्या कार्यालयाचे उदघाटन

कृष्णा-अर्जुन जिहादच्या वक्तव्यावर शिवराज पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणतात- ‘मी फक्त हे विचारले’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version