spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kantara: ‘कांतारा’ चित्रपटाने रचले नवे विक्रम; बनला दुसरा सर्वात मोठा कन्नड सिनेमा

ऋषभ शेट्टीचा कांताराहा सिनेमा दिवसेंदिवस आपला नवा रेकॉर्ड तयार करत आहे. मुळ कन्नड भाषेत असलेल्या कांतारा या सिनेमानं सर्व भाषेतील प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. कोणतंही मोठं प्रमोशन न करता सिनेमा आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय.

ऋषभ शेट्टीचा कांताराहा सिनेमा दिवसेंदिवस आपला नवा रेकॉर्ड तयार करत आहे. मुळ कन्नड भाषेत असलेल्या कांतारा या सिनेमानं सर्व भाषेतील प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. कोणतंही मोठं प्रमोशन न करता सिनेमा आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. हा चित्रपट रोज नवा इतिहास रचत आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. रिपोर्टनुसार ‘कांतारा’ चित्रपटाने ‘KGF 1’ ला मागे टाकून ‘KGF Chapter 2’ नंतर कन्नडमधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. दिवाळी वीकेंडमुळे चित्रपटाचे कलेक्शन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १७० कोटींवर पोहोचले आहे.

कन्नड भाषेतील लोकप्रियता आणि यश पाहून ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट १४ ऑक्टोबरला हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. तमिळ आणि तेलगूमध्ये १५ ऑक्टोबर रोजी आणि मल्याळम मध्ये कांतारा २० ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये आला. हिंदी भाषेतही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या १६ कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने हिंदीतही कोटींची उड्डाणं घेतली आहेत. आधी हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, पण नंतर चित्रपटाला मिळालेले अफाट यश पाहून निर्मात्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही त्याचे डबिंग केले.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘कांतारा’ चौथा आठवडा संपण्यापूर्वी २०० कोटींचा टप्पा पार करेल. ‘कांतारा’ने कर्नाटकमध्ये आतापर्यंत सुमारे १११ कोटी रुपयांची कमाई केली आहे, त्यापैकी चौथ्या आठवड्यात १४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे, जी ‘KGF’च्या पूर्ण चौथ्या आठवड्याच्या दुप्पट आहे. यशच्या ‘KGF 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाईचा विक्रम केला होता आणि कन्नडमध्ये कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आजही पहिल्या क्रमांकावर आहे.

‘कांतारा’ चित्रपट हा दंतकथा आणि ग्रामदेवतांवरील आदिवासींच्या विश्वासावरील कथा आहे. सिनेमाची कथा रीतिरिवाज आणि परंपरा आधारीत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेतसोबतच ऋषभने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाची कथा दैवी नर्तक आणि भूत कोला प्रथेवर आधारित आहे. या चित्रपटाची जादू प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसवर चालत आहे. सिनेमाची सुरूवात आणि शेवट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. सिनेमा ज्या प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे तो प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचित करणारा आहे. पवित्र रिती रिवाज आणि परंपरांच्या मागे लपलेल्या गोष्टी आणि रहस्यांचा उलगडा करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय.

हे ही वाचा:

Whats App : दोन तासानंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत

Ram Setu Twitter Review : राम सेतू चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या रिअँक्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss