‘कांतारा’चे निर्माते अडचणीत; ‘वराह रूपम’ गाणं चोरी केल्याचा आरोप

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या महिन्या भारत जवळपास दीडशे कोटी पेक्षा जास्त कमी केली आहे .कांतारा हा चित्रपट प्रकाशित होऊन एक महिना पूण होत आला असला तरीही अजूनही सर्व चित्रपटगृह पूर्णतः भरल्याचे कळले आहे. कांतारा चित्रपट सृष्टीमध्ये नवा विक्रम बनवणार असे वाटते.पण आता कांतारा चित्रपटाचे निर्माते पुन्हा एकदा अडचणीत आले आहे , मध्यंतरी ‘भूत कोला’ या परंपरेचा अपमान या चित्रपटात झाल्याचा आरोप केला गेला होता तर आता चक्क गाणं चोरी केल्याचा आरोप केला गेला आहे .

थक्कुडम ब्रिज (Thaikkudam Bridge) नावाच्या याम्युझिक बँडने त्यांचं संगीत कांतारा चित्रपटातील ‘वराह रूपम’ या गाण्यात वापरल्याचा आरोप केला आहे . या संगीत बँडच्या ‘नावरसं ‘(Navarasam) या गाण्यातील संगीताचा वापर ‘वराह रूपम’ या गाण्यात झाला असल्याचा आरोप केला आहे . हा चित्रपटाशी संबंधित वाद निर्मात्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. केरळस्थित म्युझिक बँड थक्कुडम ब्रिजच्या (Thaikkudam Bridge) तक्रारीनंतर कोझिकोड सत्र न्यायालयाने ‘कांतारा’च्या निर्मात्यांना सिनेमा आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ‘वराह रूपम’ (Varaha Roopam) गाण्यापासून रोखणारा आदेश जारी केला आहे.

लोकप्रिय इंडी म्युझिक बँडने यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी असे लिहीले होते की, ‘कांतारा’च्या निर्मात्यांनी ‘नवरसम’ गाण्याची चोरी केली आहे. यावर आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेले ‘नवरसम’ हे गाणे २०१५ मध्ये रिलीज झाले होते. तसेच कांतारा चित्रपटातील ‘वराह रूपम’ आणि ‘नवरसम’ हे गाणे एकच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, ते चित्रपटात वेगळे दाखवण्यात आले आहेत.”

थक्कुडम ब्रिजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, ‘प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कोझिकोडे यांनी निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, अॅमेझॉन, यूट्यूब, स्पॉटीफाय, विंक म्युझिक आणि इतर प्लॅटफॉर्मवर ‘कांतारा’ चित्रपटातील वराह रुपम हे गाणे परवानगीशिवाय वाजविण्यास मनाई केली आहे.

हे ही वाचा:

गुन्हेगार पोलिसांवर भारी, रात्री उशिरा अंधारात का थांबले? विचारणा केल्यास पोलिसांनाच मारहाण

कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष अडचणीत? ड्रग्ज प्रकरणी NCB कडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

गुजरातमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचासंहिता लागू, ‘या’ दिवशी मतदान होण्याची शक्यता 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version