कपिल शर्माचा दिसणार नवा लूक अन् डॅशिंग अवतार !

‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) हा भारतीय टेलिव्हिजनचा नंबर वन कॉमेडी शो आहे. हा शो केवळ देशातच नाही तर परदेशातही लोकांना खूप आवडतो.

कपिल शर्माचा दिसणार नवा लूक अन् डॅशिंग अवतार !

‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) हा भारतीय टेलिव्हिजनचा नंबर वन कॉमेडी शो आहे. हा शो केवळ देशातच नाही तर परदेशातही लोकांना खूप आवडतो. हा शो पुन्हा एकदा नवीन सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लोकांना पोट धरुन हसवणारा सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. २१ ऑगस्ट रोजी कपिल शर्मानेही (Kapil Sharma) त्याचा नवीन लूक शेअर केला होता, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने शो च्या नवीन सीझनचा उल्लेख केला होता.

प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून कपिल शर्मा शो पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. पण या शोमध्ये सपनाची भूमिका साकारणारा सर्वांचा लाडका कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आता शोमध्ये परतणार नसल्याचं कळतंय. शोच्या या नवीन सीझनमध्ये निर्मात्यांनी अनेक बदल केले आहेत. प्रत्येकजण नव्या अवतारात दिसणार आहे. यावेळी द कपिल शर्मा शोमध्ये काही नवीन पात्रही दिसणार आहेत.

मात्र, आता हा शो पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेले काही महिने कॅमेरापासून दूर असलेल्या कपिल शर्माने (Kapil Sharma) नुकताच प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. कपिल शर्माने त्याच्या शोच्या नवीन सीझनसाठी त्याच्या लूकमध्ये जबरदस्त बदल केले आहेत. हेअरस्टाइलपासून शेव आणि फिटनेसपर्यंत त्यानं सगळंच चेंड केलंय. कपिल फुल ऑन स्वॅगमध्ये दिसत आहे. कपिला हा नवा बदल, नवं ट्रान्सफॉर्मेशन पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले आहेत. त्याच्या नव्या लुकला पसंती दर्शवत आहेत. कपिलचा नवा लुक नव्या सीझनसाठीचा आहे. कपिलनेही नव्या सीझनमध्ये आपल्या नव्या लूकने चाहत्यांना प्रभावित करायचं ठरवलेलं दिसतंय. त्याचा हा नवा अवतार पाहून चाहत्यांनी पोस्टवर कमेंटचा वर्षाव केलाय. ‘उफ्फ स्मार्टी, हा हॅडसम मुलगा कोण आहे, लुकिंग शार्प, टोटली ट्रान्सफॉर्मेशन’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट पोस्टवर येताना दिसतोय. या फोटोमध्ये कपिलचा लूक पूर्णपणे बदलला आहे. कॉमेडियनचा हा नवा अवतार पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक झाले आहेत.

द कपिल शर्मा शोच्या नव्या सिझनचं शूटिंग सुरू झालं आहे. ‘द कपिल शर्मा शो’चं शूटिंग मुंबईतील फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. या सिझनच्या पहिल्या गेस्ट शोमध्ये अक्षय कुमार हजर राहणार असल्याचं समजतंय. अक्षय त्याच्या आगामी ‘कटपुतली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावणार आहे. जॅकी भगनानी निर्मित हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर २ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

 

हे ही वाचा :-

रतन टाटा यांचा ‘गुडफेलोज’च्या माध्यामतून सामाजिक उपक्रम

शिंदेंची फटकेबाजी आणि फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक!

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version