spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Karan Deol आणि Drisha Acharaya अडकले लग्नबंधनात!

गेल्या सहा वर्षांपासून द्रिशा आणि करण देओल एकमेकांना डेट करत आहेत. सध्या द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रिमध्ये कार्यरत आहे.

मुंबईतील ताज लॅन्ड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच करण देओल (Karan Deol) आणि द्रिशा आचार्य (Drisha Acharaya) यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. करण देओल हा सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांचा मुलगा आहे तर द्रिशा आचार्य (Drisha Acharaya) ही सिने-दिग्दर्शक बिमल रॉय (Bimal Roy) यांची नात आहे. या दोघांचाही विवाह अगदी धुमधडाक्यात पार पडला. अनेक बड्या कलाकारांनी करण देओल (Karan Deol) आणि द्रिशा आचार्य (Drisha Acharaya) यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.

करण देओलच्या वरातीत देओल कुटुंबातील अनेक मंडळी ढोल-ताशांच्या तालावर आनंदात नाचताना थिरकताना दिसले. या वरातीत सनी देओल, बॉबी देओल (bobby deol), आजोबा धर्मेंद्र (Dharmendra), अभय देओल (Abhay Deol), राजवीर देओल (Rajveer Deol) यांचा सहभाग होता. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर (Prakash Kaur) यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त करण आणि द्रिशाचा साखरपुडा पार पडला. आज संध्याकाळी (१८ जून) रोजी ताज लॅन्ड्स एन्ड पंचतारांकित हॉटेलमध्येच करण आणि द्रिशा यांच रिसेप्शन होणार आहे. धर्मेंद्र यांचा आपल्या नातवाच्या वरातीत नाचतानाचा व्हिडीओ सोशलमिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गेल्या सहा वर्षांपासून द्रिशा आणि करण देओल एकमेकांना डेट करत आहेत. सध्या द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रिमध्ये कार्यरत आहे. द्रिशा सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह आहे. करण देओलने २०१९ मध्ये सिनेसृष्टित पदार्पण केले. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘पल पल दिल के पास’ (Pal Pal Dil Ke Pass) या चित्रपटामार्फत कारण ने बॉलीवूडमध्ये आपले पहिले पाऊल टाकले. परंतु करणचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. २०२१ मध्ये आलेल्या ‘वेल्ले’ (velle) या सिनेमात सुद्धा करणने आपल्या अभिनयाची जादू दाखवली.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

आदिपुरुषनंतर आता भगवान महादेवावर येणार नवीन चित्रपट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss