spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

व्हॅलेंटाईन डे निमित्त करण जोहरची ‘लव्ह स्टोरीज’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर हा नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत येत असतो.

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर हा नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत येत असतो.आता लवकरच करण जोहर त्याची नवीन  ‘लव्ह स्टोरीज’ नावाची नवी सीरिज घेऊन येत आहे.व्हॅलेंटाईन डे च्या निमत्ताने ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना देशभरातील खऱ्या प्रेमाच्या सत्यकथा पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या कथा सत्यजीवनावर आधारित असतील. ज्या ६ दिग्दर्शक त्यांच्याच शब्दात सांगतील. ही सिरीज व्हॅलेंटाइन डेला पाहायला मिळणार आहे.या सिरीज मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या आयुष्यातील प्रेमाचे पैलू कसे असतात,ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

करण जोहरच्या या वेब सीरिजमध्ये या ६ खऱ्या आयुष्यातील प्रेम कथा ६ दिग्दर्शकांच्या ऐकायला मिळणार आहेत. अक्षय इंडीकर, अर्चना फडके, कॉलिन डिकुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल आणि विवेक सोनी हे ते ६ दिग्दर्शक असतील. धर्मिक एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा याची निर्मिती करत आहेत.करण जोहरने आतापर्यत बनवलेले चित्रपट हे कौटुंबिक पद्धतीतले असले तरी त्याचे सर्व असे चित्रपट सुपरहिट होत प्रेक्षकांच्या कायम पसंतीस उतरत असतात.

लव्ह स्टोरीयान हे सोशल मीडिया कम्युनिटी ‘इंडिया लव्ह प्रोजेक्ट’ मधील वास्तविक जीवनातील प्रेमकथांवर आधारित आहे. या सोशल मीडिया कम्युनिटीची स्थापना माजी पत्रकार प्रिया रमाणी, समर हलारनकर आणि निलोफर यांनी केली होती. ही सीरिज Amazon Prime Video वर प्रदर्शित केली जाणार आहे.तसचं ही  सीरिज तुम्ही व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहू शकता.दरम्यान आता प्रेक्षकांना या वेब सिरीजची प्रतिक्षा आहे.

करण जोहरचे सध्या ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ बनवत आहे.दरम्यान सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला ‘योद्धा’ चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे.जान्हवी कपूरसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ बनवत असून, आलियासोबत ‘जिगरा’ बनवत आहे. विशेष म्हणजे तब्बल २५ वर्षांनी तो सलमान खानसोबत सिनेमा बनवणार आहे. त्याचे नाव द बुल असे असणार आहे.

हे ही वाचा:

अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात आलिया-रणबीरचा डान्स ,तयारी सुरु

ED च्या नावावर वसुली करणारा महायुतीतील व्यक्ती कोण?, काँग्रेस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss