spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Saif Ali Khan पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार? Kareena – Saif वेगळे होणार?

करीना आणि सैफ ''टशन'' या चित्रपटाच्या दरम्यान दोघांची मैत्री झाली. करीना कपूरच्या आधी सैफने अमृता सिंगसोबत (Amruta Singh) लग्न केले होते.

बॉलीवूडमधील एक लोकप्रिय जोडप्यांपैकी करीना (Kareena Kapoor) आणि सैफ (Saif Ali Khan) आहेत. सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांसोबत फोटो टाकत असतात. अनेकदा त्यांच्या मुलांसोबत बाहेर जाताना किंवा खेळताना त्यांचे व्हिडिओ वायरल होत असतात. पण सध्या एक व्हिडिओमुळे चाहते नाराज झाले आहेत. त्या व्हिडिओमध्ये सैफ आणि करीना बिल्डींगच्या खाली लिपलॉक करतानाच व्हिडिओ वायरल झाला होता. नुकताच सैफ एयरपोर्टवर बाहेरगावी जाताना दिसला होता. त्यावेळी चाहत्यांचे लक्ष सैफच्या हाताकडे गेले. सैफने त्याच्या हातावर असलेला करीनाचा टॅटू काढून टाकला आहे.

सैफ अली खानच्या हातावर करीनाच्या नावाचा टॅटू होता. पण त्याजागी त्याने आता नवीन टॅटू काढला आहे. त्यामुळे आता त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. सैफ आणि करीनाच्या नात्यामध्ये काही तरी बिनसल्याची चर्चा सध्या होत आहे. ‘सैफचा पक्का घटस्फोट होणार आहे, पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार, अजून एका लग्नाची तयारी, आधी टॅटू बदलला आहे आता बायको पण बदलणार, सैफ आता हायट्रीकच्या तयारीत आहे’ अशा चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे.

करीना आणि सैफ ”टशन” या चित्रपटाच्या दरम्यान दोघांची मैत्री झाली. करीना कपूरच्या आधी सैफने अमृता सिंगसोबत (Amruta Singh) लग्न केले होते. त्यानंतर २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर करीना आणि सैफने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या आधी सैफ आणि करीनाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुर्बान, एजेंट विनोद, एलओसी कारगिल, ओमकारा या चित्रपटांमध्ये काम केले होते.

हे ही वाचा:

Savani Ravindra चा वेगळाच अनुभव, मतदान न करताच परतली

उन्हाळ्यात होतोय सनबर्नचा त्रास मग ”या” फळाचे नक्की सेवन करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss