‘मी माझ्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही..’ सैफ अली खानचा या वक्तव्यानंतर करीन सोशल मीडिया ट्रोल

‘मी माझ्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही..’ सैफ अली खानचा या वक्तव्यानंतर करीन सोशल मीडिया ट्रोल

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट रिलीज होण्यास आता अवघे काहीच दिवस उरले आहेत, मात्र त्याआधीच बॉयकॉट गँग ट्विटरवर सक्रिय झाली आहे. गायत्री आणि पुष्करच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाचा पुन्हा एकदा सोशल मीडियावर निषेध सुरू झाला आहे. यामागचे एक मोठे कारण म्हणजे साऊथमधील याच नावाच्या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. विजय सेतुपती आणि आर माधवन यांनी दाक्षिणात्य चित्रपटात जबरदस्त अभिनय केला होता. आता लोक म्हणतात की त्यांनी चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटावर आता पैसे का वाया घालवायचे? हृतिक-सैफच्या चित्रपटाला लोकांनी ‘स्वस्त कॉपी पेस्ट’ असेही म्हटले आहे. यासोबतच सैफ आणि करिनाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एकीकडे सैफ म्हणत आहे की, तो आपल्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही. तिथेच, करिना आपल्या मुलाचे नाव घेऊन मुघल शासकांचे कौतुक करताना दिसत आहे. आता याबाबत युजर्सचा संतापही उफाळून आला आहे.

हेही वाचा : 

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे मोठं व्यक्तव्य म्हणाला, हार्दिक पांड्यासारखा खेळाडू…

सैफ अली खान नेमकं काय म्हणाला ?

व्हिडीओमध्ये सैफ म्हणतोय मला इंटरनॅशनल नाव हवं आहे. ‘मी माझ्या मुलाचं नाव अॅलेकझॅन्डर किंवा राम ठेवू शकलो नाही. तेव्हा विचार केला की चांगलं मुस्लिम नाव का ठेवू नये.’ तो पुढे म्हणाला की ‘मी त्यांना धर्मनिरपेक्ष मूल्यांसह वाढवण्याची आशा करतो जेणेकरून ते एकमेकांचा आदर करतील.

करीन कपूर खान झाली ट्रोल

सैफ अली खानच्या या व्हिडिओ बरोबर त्याची पत्नी करीना कपूर खानची व्हिडिओ क्लिपही जोडण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, दुलकर सलमान एका रिअॅलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून येतो, सोनम कपूर त्याला विचारते – दुलकरचा अर्थ काय? यावर अभिनेता म्हणतो – हे अरबी नाव आहे. हे नाव अलेक्झांडरसारखेच आहे. यावर करीना म्हणते- ओ… योद्धासारखं.. म्हणजे तैमूरसारखं.

Instagram : इंस्टाग्राम यूजर्ससाठी मोठी बातमी; नवं फिचर आले भेटीस

‘विक्रम वेधा’ हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तमिळ चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झाला होता. मूळ चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘विक्रम वेधा’चे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. तो एक अॅक्शन-थ्रिलर आहे. ‘विक्रम वेधा’ ची कथा एक कडक पोलीस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) आणि एक खतरनाक गँगस्टर वेधा ऋतिक रोशन यांची आहे. या चित्रपटात हृतिक आणि सैफ व्यतिरिक्त राधिका आपटे, रोहित शराफ, शारिब हाश्मा, योगिता बिहानी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

गव्हाच्या पिठापासून बनवा ३ वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि करा सकाळचा नाश्ता स्पेशल

Exit mobile version