spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रेक्षकांच्या मनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी बॉलीवूडमध्ये कार्तिक आर्यन सर्वोच्च स्थानावर; पहा काय आहे कारण

मागील दोन वर्षांपासून बॉलीवूड चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे देशातील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसला याचा मोठा फटका बसला आहे. सध्या सगळीकडे अशी चर्चा सुरु आहे की आज हिंदी चित्रपटसृष्टीत शाह रुख खानला वगळता कार्तिकपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आणि आशादायक चित्रपटांची श्रेणी असलेला एकही अभिनेता नाही. मुख्य कलाकारांच्या नवीन पिढीमध्ये, कार्तिक कदाचित प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि बॉक्स ऑफिसवर पुढील १२ महिन्यांत राज करण्यासाठी सर्वोत्तम स्थानी आहे असल्याचे सांगितलं जात आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आगामी चित्रपट शहजादाचा टीझर/फर्स्ट लुक टाकला आहे . विशेष आहे कारण तो पहिल्यांदाच बाहेरच्या मसाला एंटरटेनरमध्ये दिसणार आहे आणि तेही भरपूर अॅक्शनसह. टीझरमध्ये कार्तिक गुंडांना किक मारताना आणि बाइक चालवताना दिसत आहे . ९० च्या दशकातील ‘नायकां’प्रमाणेचदिसत आहे . त्यामुळे कार्तिक आरत्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे , काहींना आनंद झाला नाही तर काही उत्साही आहेत . आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर साध्या विनोदी भूमिका करणाऱ्या अभिनेत्यासाठी ही एक धाडसी निवड आहे. तथापि, ही एक उच्च बक्षीस चाल आहे. हा चित्रपट तेलुगू हिट अला वैकुंठापुरमुलूवर आधारित आहे, ज्याने २०२०मध्ये बॉक्स ऑफिसवर २६२कोटी कमावले होते . .

कार्तिक आर्यनला एक प्रस्थापित अभिनेता म्हणून मानले जाऊ शकते.कारण तो सुमारे एक दशकाहून अधिक काळापासून चित्रपटसृष्टीत आहे म्हणून तो पण प्रेक्षकांच्या बदललेल्या अभिरुचीनुसार प्रयोग आणि नव्याने शोध घेण्यासाठीउत्सुक असतो. तो तसाच प्रयत्न करत असल्याचा पुरावा त्याचे आगामी दोन चित्रपट आहेत. हे कसे घडते हे पुढील वर्षभरात स्पष्ट होईल. पण फक्त हा प्रयत्न करून कार्तिकने स्वतःला त्याच्या समकालीन लोकांपेक्षा चांगल्या स्थितीत आणले आहे.तसाही कार्तिक आर्यां दोन आगामी चित्रपटांमार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तासेच कार्तिक आर्यन हा फ्रेडी आणि शेहजादाया चित्रपटांच्या शूटिंग नंतर, त्याच्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटात रोमँटिक कॉमेडीसह परत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Measles Outbreak : मुंबई, ठाण्यानंतर भिवंडी, नाशिक, मालेगावात गोवरचा मोठ्या प्रमाणात शिरकाव; राज्य सरकारकडून तातडीची बैठक

Latest Posts

Don't Miss