कार्तिक आर्यनने सांगितले की, फ्रेडीच्या भूमिकेमुळे दैनंदिन जीवनात त्रास सहन करावा लागला

कार्तिक आर्यनने सांगितले की, फ्रेडीच्या भूमिकेमुळे दैनंदिन जीवनात त्रास सहन करावा लागला

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा एकदम कमी कालावधीत जास्तीत जास्त भूमिकेत काम करणारा अभिनेता ठरला आहे. सध्या कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी थ्रिलर फ्रेडीमध्ये पहिल्यांदाच ग्रे कॅरेक्टर साकारत आहे.कार्तिक डेंटिस्टच्या भूमिकेत आहे, जो एक खुनी आहे. कार्तिक आर्यांनाने सांगितलं की या भूमिकेचा त्याच्या मानसिकतेवर आणि भावनिक आरोग्यावर परिणाम झाला, ज्यामुळे त्याला रात्री झोप येत नव्हती. त्यापासून दूर जाण्यासाठी मदत करण्यासाठी त्याला त्याच्या कुटुंब आणि मित्रांकडे वळावे लागले असे त्याने सांगितले.

फ्रेडी हा चित्रपट एका डॉक्टरच्या प्रवासावर आधारित आहे,जो एक लाजाळू, एकाकी आणि सामाजिकदृष्ट्या विचित्र व्यक्ती आहे. ज्याला त्याच्या खेळण्यांसोबत खेळायला आवडते आणि त्याचा एकमेव मित्र म्हणजे त्याचा पाळीव कासव हार्डी. या तीव्र भूमिकेसाठी त्याच्या तयारीबद्दल बोलताना कार्तिकने सांगितले की , “चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कार्तिक अक्षरशः फ्रेडीच्या दुनियेत राहिला. त्या हेडस्पेसमध्ये राहून सेटवर जाऊन परफॉर्म करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. फ्रेडीच्या भूमिकेमुळंमुळे कार्तिकला मानसिक त्रास सहन करावा लागला.पण मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं होतं आणि फ्रेडीचं शूटिंग करताना माझ्या नियमित हालचाली कमी करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून कार्तिक चित्रपट आणि पात्रावर लक्ष केंद्रित करू शकेल.”

कार्तिक आर्यनने पुढे सांगितले की, चित्रपटाचे शूट संपल्यानंतर, त्याला मानसिक आजारातून बाहेर पाडण्यासाठी त्याच्या जवळच्या लोकांची मदत घ्यावी लागली. “चित्रपटाच्या शूटिंगनंतर कार्तिकने त्याचे मित्र आणि कुटुंबाशी संपर्क साधला ज्यांनी त्याला आधार दिला आणि यामुळे त्याला पुन्हा वास्तवात आणि सामान्य स्थितीत परत येण्यास मदत झाली,” असे कार्तिकने सांगितले.कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चित्रपट शेहझादाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि या शेहझादा चित्रपटात कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर त्याबरोबर शेहझादामध्ये क्रिती सेनन, परेश रावलदेखील असणार आहेत.

Bigg Boss 16: सलमान खान कायम प्रियांकालाच लक्ष्य करतो ; देवोलिना भट्टाचार्जीने केला आरोप

Exit mobile version