Karwa Chauth 2022 : चित्रपटांमुळे आले ‘करवा चौथ’ व्रताला ग्लॅमर रूप… ‘या’ अभिनेत्री साजरा करणार पहिला ‘करवा चौथ’

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हरतालिका व्रत (Hartalika 2022) तसेच वटसावित्रीची (Vatsavitri) पूजा केली जाते. तशीच करवा चौथ ही प्रथा उत्तर भारतात फार महत्वाची मानली जाते.

Karwa Chauth 2022 : चित्रपटांमुळे आले ‘करवा चौथ’ व्रताला ग्लॅमर रूप… ‘या’ अभिनेत्री साजरा करणार पहिला ‘करवा चौथ’

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हरतालिका व्रत (Hartalika 2022) तसेच वटसावित्रीची (Vatsavitri) पूजा केली जाते. तशीच करवा चौथ ही प्रथा उत्तर भारतात फार महत्वाची मानली जाते. तसेच, अलीकडे टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या अनेक हिंदी मालिकांमधून करवा चौथच्या व्रताला आणखीनच ग्लॅमर आले आहे. काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये हा सण अगदी खास पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. करवा चौथ हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करणारे बॉलिवूड चित्रपट कोणते? ते जाणून घेऊयात…

हम दिल दे चुके सनम (Hum Dil De Chuke Sanam)
१९९९ मध्ये रिलीज झालेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील ‘चांद छुपा बादल में शरमा के मेरी जाना’ या गाण्यात अगदी खास पद्धतीनं करवा चौथ हा सण साजरा करण्यात आला आहे. या गाण्यात करवा चौथ हा सण दोन वेळा साजरा करण्यात आला. ऐश्वर्या ही या चित्रपटात नंदिनी ही भूमिका साकरते. नंदिनी ही एका सिनमध्ये समीरसोबत हा सण साजरा करताना दिसत आहे तर दुसऱ्या सिनमध्ये ती वनराजसोबत हा सण साजरा करते. चित्रपटात समीर ही भूमिका सलमान खाननं साकारली आहे. तर वनराज ही भूमिका अजय देवगणनं साकारली आहे.

कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham)
कभी खुशी कभी गम या चित्रपटातील बोले चुडीया हे गाणं आजही प्रेक्षक आवडीनं ऐकतात. या गाण्यात करीना कपूर, हृतिक रोशन, काजोल, शाहरुख खान हे सर्व जण ‘करवा चौथ’ हा सण साजरा करताना दिसत आहेत. अगदी खास पद्धतीनं या चित्रपटात करवा चौथ सण दाखवण्यात आला आहे.

ज्यापद्धतीने चित्रपटामध्ये करवा चौथच्या व्रताला आणखीनच ग्लॅमर रूप मिळाले आहे त्याच पद्धतीने आता अनेक नागरिक हे व्रत साजरे केले जाते. करवा चौथची धामधूम बॉलिवूडमध्येही पाहायला मिळते. शिल्पा शेट्टीपासून अनुष्का शर्मापर्यंत अनेक अभिनेत्री आपल्या पतींसाठी हे व्रत करतात. या खास दिवशी सगळ्या अभिनेत्री सोशल मीडियावर सेलिब्रेशन फोटो देखील शेअर करतात. यंदा बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा माहोल होता. अनेक जोडप्यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यंदा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा करणार आहेत.

आलिया भट्ट (Alia bhatt)
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी या वर्षीच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री आलिया भट्टने यावर्षी १४ एप्रिल रोजी रणबीर कपूरसोबत लग्न केले. त्यामुळे यंदा त्यांचा पहिला करवा चौथ असणार आहे. त्यांचा हा पहिला करवा चौथ खूप खास असणार आहे, कारण आलिया लवकरच आई होणार आहे.

 अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकी जैनसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अंकिता लोखंडे अनेकदा सोशल मीडियावर पारंपारिक अवतारात झळकली होती. अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करताना दिसत आहे. दरम्यान, यंदा अंकिताचा देखील पहिलाच करवा चौथ आहे. अभिनेत्री हा सण देखील मोठ्या थाटात साजरा करणार आहे.

 कतरिना कैफ (Katrina Kaif)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिचे नाव देखील चर्चेत आहे. ९ डिसेंबर २०२१ रोजी कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. यंदा अभिनेत्री आपले पहिले करवा चौथ व्रत ठेवणार आहे. विकी एका पंजाबी कुटुंबातील आहे, जिथे हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे यंदा कौशल कुटुंबात आनंदाचा सोहळा साजरा होणार आहे.

हे ही वाचा :

बॉलीवूड सिंगर बादशाह गुपचूप करत आहे या अभिनेत्रीला डेट, वर्षभरानंतर झाला खुलासा

Diwali 2022 : अगदी सोप्या पद्धतीत तुम्हला जमतील अशा खास मेहंदी डिझाइन्स

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात गटबाजीला सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version