Katrina kaif प्रेग्नेंट? पण कोणामुळे?

Katrina kaif प्रेग्नेंट? पण कोणामुळे?

कतरीना कैफ (Katrina kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे बॉलीवूडमधील नावाजलेले जोडपे आहे. २०२१ मध्ये दोघांनी लग्न केले. कतरिना आणि विकीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या एक फोटो सोशल मडिडियावर चांगलाच वायरल होत आहे. अभिनेत्री कतरीना कैफ प्रेग्नेंट आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. कतरीना प्रेग्नेंट असल्यामुळे विकी तिला भेटायला लंडनला गेला आहे असे सांगण्यात येत आहे.

कतरीना प्रेग्नेंट असल्याच्या अफवा जास्त पसरत होत्या. जोपर्यंत कतरीना आणि विकी स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कतरीना सध्या तिच्या वैयक्तिक कामानिमित्त लंडनमध्ये आहे. कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आता या फॅमिली ट्रिपमध्ये विकी पण सहभागी झाला आहे. त्यामुळे अजूनही कतरीना आणि विकीने फॅमिली प्लॅनिंगचा विचार केला नाही. कतरिनाने २०२४ मध्ये आलेल्या ”मेरी क्रिसमस” चित्रपटामध्ये काम केले होते. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपातीसोबत तिने काम केले होते पण तिचा चित्रपट फ्लॉप ठरला. कतरिनाने आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही. त्यामुळे कतरीनाचे चाहते नव्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कतरीना कैफ ही बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटांबरोबर जाहिरातीमध्ये पण काम केले आहे. ‘बूम’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.

हे ही वाचा : 

चॉकलेट,पेस्ट्री खाऊन कंटाळलात ? मग एकदा “चोको मिल्क” ट्राय करुन बघाच

लग्नाच्या पाच वर्षानंतर रणवीरने केले फोटो डिलीट ?; चाहता वर्ग नाराज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version