‘कौन बनेगा करोडपती 14’ला पहिल्यांदाच मिळाली एक महिला करोडपती स्पर्धक; प्रोमो होतोय वायरल

'कौन बनेगा करोडपती १४' सुरू होऊन आता काही दिवस झाले आहेत असून दिवसेंदिवस कार्यक्रम अधिकच रंगत आहे. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत.

‘कौन बनेगा करोडपती 14’ला पहिल्यांदाच मिळाली एक महिला करोडपती स्पर्धक; प्रोमो होतोय वायरल

‘कौन बनेगा करोडपती १४’ सुरू होऊन आता काही दिवस झाले आहेत असून दिवसेंदिवस कार्यक्रम अधिकच रंगत आहे. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अनेकांनी नशीब आजमावलं आहे. अनेक स्पर्धक लखपती झाले आहेत. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे चौदावे पर्व सुरू आहे. हा शो सुरू होऊन जवळपास ४० दिवस होऊन गेले तरी अद्याप या पर्वाला करोडपती होणारा स्पर्धक मिळाला नव्हता. १ करोड ही रक्कम आजवर कुणीही जिंकू शकलं नाही. पण अखेर तो क्षणही आला. ‘कौन बनेगा करोडपती’च्या आगामी भागात प्रेक्षकांना पहिल्यांदाच एक महिला करोडपती झालेली पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरच्या ‘कविता चावला’ या kbc 14 च्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत.

कौन बनेगा करोडपतीच्या १४ व्या सीजनमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. या सीझनमध्ये १ कोटी कमावणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत. याआधीही कविता यांनी ‘कौन बनेगा करोड’ पतीमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र त्या हॉटसीटपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या. पण हार न मानता पुन्हा जुद्दीने शोमध्ये परतल्या आणि जिंकल्या सुद्धा आहेत. कविता चावला एक कोटी जिंकल्यानंतर आता ती ७. ५ कोटी जिंकते का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या चौदाव्या पर्वात काही बदल करण्यात आले आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे ‘कौन बनेगा करोडपती’च्या बक्षीसाच्या रकमेत काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे कविता चावला किती पैसै जिंकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.या सीझनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता बक्षिसाची रक्कम ७ कोटींऐवजी ७.५ कोटी रुपये आहे. तसेच ५० लाखांनंतर ७५ लाख रुपयांचा एक प्रश्न देखील देण्यात आला आहे. आता स्पर्धकांना ५० लाखांनंतर ७५ लाख रुपये जिंकण्याचीही संधी आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत एकही स्पर्धक करोडपतींच्या यादीत सामील झालेला नाही.

हे ही वाचा:

७० वर्षांनंतर चित्ता पुन्हा भारतीय भूमीवर, पंतप्रधान मोदी म्हणाले…

Akshara Singh: लीक MMS वर अक्षरा सिंहने दिले स्पष्टीकरण, म्हणाली…

पोलीस भरती झालीच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version