spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kaun Banega Crorepati 15, अखेर शूटिंगला सुरुवात…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऍलिटी शो कौन बनेगा करोडपती (KBC) हा प्रेक्षकांचा आवडीचा शो आहे. गेल्या २३ वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. इ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऍलिटी शो कौन बनेगा करोडपती (KBC) हा प्रेक्षकांचा आवडीचा शो आहे. गेल्या २३ वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. इतके वर्ष चालूनही या शोला प्रेक्षनकांचा अजूनही छान प्रतिसाद मिळतो. हा शो एक भारतीय प्रसिद्ध हिंदी रियालिटी गेम शो आहे. प्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या शोमध्ये विजेत्यास सात कोटी रुपयांपर्यंतचे बक्षिसे दिली जातात. UK (युनायटेड किंग्डम)च्या प्रसिद्ध “Who Wants To Be Millionaire” मालिकेवरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला.

यंदा या शोचा १५ वा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या शोची प्रतिक्षा करत होते.बॉलिवूडचे बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन हा शो होस्ट करतात. त्यांच्या विनोदी आणि तितिक्याच गंभीर शैलीमुळे ते प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.आता या कौन बनेगा करोडपतीचा (KBC) १५ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता त्यातच बिग बींनी चाहत्यांना या शो बद्दल अपडेट दिली आहे. त्यांनी शोच्या सेटवरचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे. हा फोटो केबीसीच्या (KBC) सेटवरचा आहे हे समजून येते. त्यामुळेच आता प्रेक्षकांना या शो साठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचे समजून येत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘केबीसीसाठी (KBC) पुन्हा पुन्हा रिहर्सल सुरु आहे.’ याचा अर्थ असाच की केबीसी आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान मागेच कौन बनेगा करोडपती १५ च्या निर्मात्यांनी (Producers) या शोचा नवीन प्रोमो रिलीज केला होता. या प्रोमोद्वारे अमिताभ बच्चन यांनी यावेळी शोचे स्वरुप बदणार असल्याचे सांगितले होते. आता नक्की काय बदलले असेल, ते तर शो पाहिल्यानंतरच समजेल. या शोचा हा १५वा सीझन सोनी वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. या शोसाठीची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. मात्र हा शो नक्की कधी चालू होणार, हे अद्याप समजलेले नाही.

हे ही वाचा:

जिल्यामधील धोकादायक इमारतींमधून नागरिकांचे स्थलांतर करण्यात यावे – पालकमंत्री शंभूराजे देसाई

भारतासाठी तिसरा दिवस ठरला कठीण, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे उत्तम प्रदर्शन

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी दिला नाही, देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss