कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यसोबत बसणार आमिर खान

यंदा देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना KBC 14 च्या निमित्ताने या कार्यक्रमात नवीन पाऊल टाकले जात आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यसोबत बसणार आमिर खान

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या क्विझ रिॲलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या 14व्या सीझनसह टेलिव्हिजनवर परतणार आहेत. या शोचा पहिला सीझन 2000 मध्ये प्रसारित झाला होता. आता कौन बनेगा करोडपती सीझन 14 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती 14 या शोची तयारी आता सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौन बनेगा करोडपती 14 च्या मंचावर शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. आमिर खान कौन बनेगा करोडपती सीझन 14 च्या पहिल्या एपिसोडला हजेरी लावत अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसणार आहे.

हेही वाचा

या कारणामुळे कतरिनाने एकटीने साजरा केला वाढदिवस

 

कौन बनेगा करोडपती च्या 14व्या सीझन मध्ये यंदा बरेच बदल करण्यात आले आहेत. नुकताच या शो संबंधित एक प्रोमो रिलीज करण्यात आला होता ज्यामध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकांना असे म्हणताना दिसले होते की, ‘जर तुम्ही खेळलात आणि बरोबर उत्तर दिले तर तुम्ही 7.5 कोटी रुपये जिंकाल. त्यानंतर स्पर्धक विचारात पडतो आणि पुढे खेळण्यास नकार देतो. त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणताना दिसत आहेत, दुर्दैवाने प्रश्नाचे उत्तर चुकीचे असेल तर तुम्हाला 75 लाख रुपये नक्कीच मिळतील. यंदा देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना KBC 14 च्या निमित्ताने या कार्यक्रमात नवीन पाऊल टाकले जात आहे.

आता अभिनेता आमिर खानला कौन बनेगा करोडपती 14 मध्ये पाहण्यासाठी प्रत्येक जण खूप उत्सुक आहे. त्याचबरोबर आमिर खान लवकरच लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर खान देखील दिसणार आहे.

Exit mobile version