पोन्नियिन सेल्वन सिनेमातील ‘कावेरी से मिलने’ गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस

पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोन्नियिन सेल्वन सिनेमातील ‘कावेरी से मिलने’ गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस

'कावेरी से मिलने' गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस

Ponniyin Selvan : पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटचा प्रथम पोस्टर नंतर टीझर लॉन्च करण्यात आला. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता पोन्नियिन सेल्वन या चित्रपटातील ‘कावेरी से मिलने’ हे पहिले गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेक्षकांनी या गाण्याला देखील प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

‘पोन्नियिन सेल्वन’ हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. ‘कावेरी से मिलने’ हे गाणं टिप्स ऑफिशयल या युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. ए आर रहमान, स्वागत राठोड आणि पूजा तिवारीने गायले आहे. तर या गाण्याचे बोल महबूब यांनी लिहिले आहे. तर ए आर रहमान यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे.

‘पोन्नियिन सेल्वन’ हा सिनेमा 30 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, कार्थी, तृषा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धूलिपाला, प्रभू, आर सरथकुमार, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, रहमान आणि आर पार्थिबन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. शिवाय हा चित्रपट आजवरचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे.

हेही वाचा :  

सत्ताकारण विनोदी पद्धतीने मांडणारी वेब सीरिज ‘मी पुन्हा येईन’ झाली प्रदर्शित

Exit mobile version