KBC 14 : नवरात्रीनिम्मित खेळाचे नियम बदलले

सोमवारी कौन बनेगा करोडपती १४ च्या (KBC 14) एपिसोडमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, नवरात्री स्पेशल एपिसोड खूप खास असणार आहे. ‘नवरात्री दरम्यान देशातील ९ विविध राज्यांमधून ९ अतिशय खास महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

KBC 14 : नवरात्रीनिम्मित खेळाचे नियम बदलले

सोमवारी कौन बनेगा करोडपती १४ च्या (KBC 14) एपिसोडमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, नवरात्री स्पेशल एपिसोड खूप खास असणार आहे. ‘नवरात्री दरम्यान देशातील ९ विविध राज्यांमधून ९ अतिशय खास महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या महिला कौन बनेगा करोडपती १४ च्या मंचावर येतील आणि मनोरंजक खेळ खेळतील’ असे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सांगितले.

कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) काही नियम आधीच बदलण्यात आले आहेत. फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये पूर्वी फक्त एकच प्रश्न विचारला जायचा आणि सर्वांत जलद उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला संधी मिळायची. आता अमिताभ तीन प्रश्न विचारतात आणि त्यानंतर कोणत्या स्पर्धकाने सर्वांत वेगवान उत्तरे दिली याची सरासरी काढली जाते. यानंतर हॉटसीटवर बसण्याची संधी दिली जाते.

अमिताभ बच्चन यांनी महिलांना स्टेजवर बोलावून सर्वांची ओळख करून दिली. परिचयानंतर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ठकलेली व मध्य प्रदेशातून आलेली राणी पाटीदार हॉटसीटवर बसली. अमिताभ बच्चन यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान राणीने सांगितले की, तिचे राज्य ३S साठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे ‘सेव, साडी आणि सोना’. यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राणी पाटीदारसोबत कौन बनेगा करोडपतीचा खेळ सुरू केला. राणी अतिशय हुशारीने प्रश्नांची उत्तरे देत पुढे गेली. २० हजाराच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर हूटर वाजल्याने राणी पाटीदार यांना थांबावे लागले. अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्या दिवशी भेटण्याचे आश्वासन देऊन सेट सोडला.

 

हे ही वाचा:

‘कौन बनेगा करोडपती 14’ला पहिल्यांदाच मिळाली एक महिला करोडपती स्पर्धक; प्रोमो होतोय वायरल

‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला पाहुणा आमिर खान, अमिताभ बच्चनही करणार या सेलिब्रिटींचे स्वागत

कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यसोबत बसणार आमिर खान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version