spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केदार शिंदेंची कन्या झळकणार ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटांमध्ये, महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार

मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे उत्तम कलाकार व दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांची छाप महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आहे. नामवंत शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत.

मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे उत्तम कलाकार व दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांची छाप महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आहे. नामवंत शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी आज पर्यंत करत आले आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित लवकरच एक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. या चित्रपटांमध्ये प्रसिद्ध कलाकार अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका करत आहे.

अंकुश चौधरी शिवाय या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यात येणार आहे. याबद्दल नुकतेच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या व्यक्तिरेखेबद्दलची माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. ती व्यक्तिरेखा म्हणजे ‘भानुमती कृष्णराव साबळे’ म्हणजे शाहिरांची ‘पत्नी’. महत्त्वाचे म्हणजे शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे ‘सना केदार शिंदे’. दिग्दर्शक केदार शिंदे यांची कन्या. पोस्टमध्ये ते असं म्हणाले, ‘आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं. सौ. भानुमती कृष्णराव साबळे आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती ‘सना केदार शिंदे’. पणजीच्या भूमिकेत पणती’.

दिग्दर्शक केदार शिंदे स्वतः एक उत्कृष्ट लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, गायक आहेतच. पण आता त्यांची मुलगी देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठीत देखील आता स्टार किड्स येत आहेत. केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यादेखील निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया असून या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.


आज, दिग्गज शाहीर साबळे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त, चित्रपट निर्मात्याने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे आजोबा आणि दिग्गज कलाकार शाहीर साबळे यांना एक छोटासा व्हिडिओ शेअर करून श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आगामी बायोपिकच्या शीर्षकाचे अनावरण केले.महाराष्ट्र शाहीर’.
त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर घेऊन, आज ३ सप्टेंबर. महाराष्ट्र शाहीर साबळे जन्मोत्सव… त्यांना मानाचा मुज महाराष्ट्र शाहीर…” असे पोस्टच्या कॅप्शन मध्ये म्हटले आहे.

 

हे ही वाचा:

भारत विरुद्ध पाकिस्तानचा पुन्हा सामना रंगणार

‘…. दसऱ्याला शिवतीर्थावर तुम्हीच मेळावा घ्या’, संदीप देशपांडे यांची मागणी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss