केतकी चितळे ला मोठा दिलासा

केतकी ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. त्यावरून पुढे अनेक घडामोडी घडल्या.

केतकी चितळे ला मोठा दिलासा
अभिनेत्री केतकी चितळे आपल्या फेसबुक पोस्टमुळे गेल्या महिन्याभरापासून तुरुंगात आहे. केतकी ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. त्यावरून पुढे अनेक घडामोडी घडल्या. केतकी वर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. केतकी चितळे ला १५ मे रोजी अटक करण्यात आली होती.
केतकी सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असते. ती अनेकदा तिची मतं सोशल मीडियाचा माध्यमातून व्यक्त करताना दिसते. केतकीच्या आक्षपार्ह पोस्टमुळे राज्यभरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करत तिच्यावर कारवाईची मागणी केली जात होती. ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात बदनामी करणे, तेढ निर्माण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकीने फेसबूकवर शेअर केली होती. त्यामुळे तिच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात महिला आयोगानेही उडी घेतली होती.
केतकी चितळे ला मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी तिच्या जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात यावेळी केतकीच्या जामिनाला विरोध न करण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री केतकी चितळे ला ठाणे न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Exit mobile version