Khupte Tithe Gupte, दाऊद इब्राहिमला समीर वानखेडेंचं खुलं चॅलेंज

छोट्या पडद्यावर सध्या विशेष गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे खुपते तिथे गुप्ते (khupte thithe gupte). जवळपास १२ वर्षानंतर अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) हा कार्यक्रम सुरु झाला आहे.

Khupte Tithe Gupte, दाऊद इब्राहिमला समीर वानखेडेंचं खुलं चॅलेंज

छोट्या पडद्यावर सध्या विशेष गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे खुपते तिथे गुप्ते (khupte thithe gupte). जवळपास १२ वर्षानंतर अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) हा कार्यक्रम सुरु झाला आहे. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये आजपर्यंत विविध सेलिब्रिटी आणि राजकारणी मंडळींनी हजेरी लावली आहे. प्रत्येक एपिसोडमधून कोणत्या ना कोणत्या गोष्टी चर्चेत आल्या आहे. अलीकडेच या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकर सहभागी झाली होती. रविवारी ३० जुलै रोजी हा एपिसोड प्रसारित झाला. यानंतर या कार्यक्रमात आगामी एपिसोडमध्ये कोण सहभागी होणार आहे, हेदेखील समोर आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर नेक नावाजलेल्या आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली आहे. तर आता लवकरच या कार्यक्रमात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) सहभागी होणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. हा प्रोमो झी मराठीने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला आहे. खुपते तिथे गुप्ते’ च्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये समीर वानखेडे यांना दाऊद इब्राहिमसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अवधूतने विचारले की, ‘दाऊद इब्राहिमकडून तुम्हाला धमक्या येत आहेत, असं लोक म्हणतात.’ त्यावर समीर यांनी अत्यंत परखड भाषेत उत्तर दिलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाऊद इब्राहिमला खुलं चॅलेंज दिलं आहे.

“आमच्यासाठी हे खूप लहान गुन्हेगार आहेत आणि त्यांचं नाव घेऊन मी त्यांना आणखी प्रसिद्ध करणार नाही. मी त्यांच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. मी त्यांना चॅलेंज करतो, तिथे परदेशात बसून धमक्या वैगरे अजिबात देऊ नकोस, जर हिंमत असेल तर समोर येऊन धमक्या दे”, असं समीर वानखेडे म्हणाले. दरम्यान, समीर वानखेडे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे हा भाग पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रमा काही प्रमाणात ट्रोल झाला होता. शो या मुद्द्यावरुन ट्रोल झाला की यामध्ये फक्त राजकारणी लोक सहभागी होत आहेत, सेलिब्रिटी नाही. दरम्यान आजपर्यंत अवधूतच्या या कार्यक्रमात राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, डॉ. अमोल कोल्हे, संजय राऊत, नारायण राणे, उर्मिला मातोंडकर या राजकारणी मंडळींनी सहभाग नोंदवला आहे. तर श्रेयस तळपदे आणि सई ताम्हणकर हे सेलिब्रिटीही यात सहभागी झालेले.

हे ही वाचा:

संपूर्ण विदर्भासह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’..

WI vs IND, 2nd ODI: हार्दिक, संजू आणि सूर्याही फ्लॉप, भारताचा सहा विकेट्सने पराभव..

संजय शिरसाट यांच्या निशाण्यावर संभाजी भिडे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version