कियारा – कर्तिकच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले; धार्मिक वाद टाळण्यासाठी घेतला निर्णय

त्यामुळे चित्रपटावरून सुरू असलेला हा वाद टाळण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

कियारा – कर्तिकच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले; धार्मिक वाद टाळण्यासाठी घेतला निर्णय

सत्यप्रेम की कथा

कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन हे मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सत्यनारायण की कथा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. गेल्या वर्षी चित्रपटाची घोषणा होताच अनेकांनी हा चित्रपट हिंदुत्वविरोधी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे चित्रपटावरून सुरू असलेला हा वाद टाळण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे नाव बदलल्याची माहिती, चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करत कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे.

या चित्रपटात कियारा अडवाणी ‘कथा’ नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे तर कार्तिक आर्यन हा सत्यप्रेम या व्यक्तिरेखित आहे. रविवारी कियारा अडवाणीच्या वाढदिवसाचे निमित्त साधत कार्तिक आर्यनने कियारा अडवणीला शुभेच्छा देत इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली. कार्तिकने आपल्या इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला आणि चित्रपटाचे नाव ‘सत्यप्रेम की कथा’ असे करण्यात आल्याचा खुलासा केला.

गेल्या वर्षी चित्रपटाचे नाव जाहीर होतात मध्यप्रदेशातील काही संघटनांनी चित्रपटाच्या नावाला विरोध करायला सुरुवात केली होती. तसेच चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी चित्रपटाचा असं नाव ठेवल्यामुळे हिंदू देवतांचा अपमान होत आहे, असा दावाही त्यांनी केला होता. एवढेच नव्हे तर साजिद नाडियादवाला कधी भोपाळला आले तर त्यांच्या चेहऱ्याला काळ फासण्याचा इशारा देखील या संघटनांनी दिला होता.

लोकांचा वाढता विरोध पाहता चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी ट्विट करून यावर स्पष्टीकरण देत चित्रपटाचे नाव बदलणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती, “कोणत्याही चित्रपटाचे नावं फार विचार करून ठरवलं जातं. यातून कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही व तसेच भविष्यातही त्यामुळे कोणाच्या भावाला दुखावणार जाऊ नये म्हणून सत्यनारायण की कथा हे नाव बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे”.

Exit mobile version