जाणून घेऊया नक्की कसा आहे किच्चा सुदीपचा नवा सिनेमा

हा चित्रपट 2D व्यतिरिक्त 3D मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

जाणून घेऊया नक्की कसा आहे किच्चा सुदीपचा नवा सिनेमा

KGF, RR, पुष्पा अशा अनेक सिनेमांनी हल्लीच्या काळात खूप प्रसिध्दी मिळवली आहे आणि सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार अजून एक दाक्षिणात्य सिनेमा म्हणजे विक्रांत रोना.

काय आहे विक्रांत रोना सिनेमाची कथा?

एका गावात लहान मुलं गायब होणं आणि त्यांचा खून होणं यासंबंधी या सिनेमाची कथा आहे. या सर्व खुनांचा संबंध हा गावातील दागिने घेऊन पळून गेलेल्या  कामरोत्तू घराशी असल्याचे गावकरी सांगतात आणि या सिनेमात विक्रांत रोनाची भूमिका साकारणारा अभिनेता किच्ची संदीप झपाटलेल्या ‘कामरोत्तू घर’चे गूढ उकलण्याची जबाबदारी तो स्वत:वर घेतो. अशी एकंदरीत ह्या सिनेमाची कथा आहे.

विक्रांत रोना हे किच्चा सुदीपच्या वीरतेबद्दल आणि तो संपूर्ण  गावाला कशाप्रकार  वाचवतो याबद्दल आहे. त्याचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स विलक्षण असून, ते या चित्रपटाच्या प्रमुख वैशिष्ट्पैयांपैकी एक आहेत. विक्रांत रोना सिनेमाचे चित्रीकरण मुख्यतः घरामध्ये केल्यामुळे, ही या सिनेमाची एक कमतरता ठरते. घनदाट जंगल आणि धबधबा याशिवाय लोकेशन्सच्या बाबतीत ह्या चित्रपटात फार काही पाहायला मिळत नाही . पण टीमने व्हीएफएक्स आघाडीवर चांगले काम केले आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची भूमिका सिनेमात फार वेळ नाहीये. हा मुळात एक विस्तारित कॅमिओ आहे जो कोणत्याही प्रकारचा शाश्वत प्रभाव सोडत नाही. तथापि, ‘रा रा रक्कम्मा’ गाण्यात किच्चा सुदीपसोबत जॅकलीनची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री शानदार दिसते, जी आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

निरुप भंडारी संजूची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे करते, तर नवोदित कलाकार नीथा अशोक तिच्या भूमिकेला तितकाच न्याय देते. दोघंही त्यांच्या पडद्यावरच्या उपस्थितीने प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास सक्षम आहेत. पण सुदीप त्याच्या लार्जर-दॅन-लाइफ व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.

विविध कॉमिक, हॉरर आणि थरारक घटकांचा समावेश करूनही, विक्रांत रोना सिनेमा अनेक ठिकाणी गडबडतो. इतकंच नाही तर चित्रपटाची अंमलबजावणीही अनेक ठिकाणी यादृच्छिक दिसते. कथा टाळता येण्याजोग्या आणि समस्याप्रधान विनोदांमुळे ओव्हरबोर्ड जाते. विशेषत: उत्तरार्धात विक्रांत रोना कथानकावरील पकड गमावून बसलेला दिसतो आणि कथेत गोंधळ निर्माण होतो.

बॉक्स ऑफिसवर नक्की किती कमाई करणार विक्रांत रोना?

विक्रांत रोना हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. या खास चित्रपटाचे बजेट ९५ कोटींचे आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट पहिल्या दिवशी ४० कोटींची कमाई करू शकतो. म्हणजेच काय तर या चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त ठरणार हे नक्की. विक्रांत रोना या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा चित्रपट 2D व्यतिरिक्त 3D मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विक्रांत रोनाच्या बुकिंगला खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळतोयं. केवळ अॅडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटाने सुमारे ४.११ कोटी रुपये कमावले आहेत.एकंदरीत, किच्चा सुदीपच्या कट्टर चाहत्यांसाठी विक्रांत रोना हा एक मेजवानी आहे.

 

Exit mobile version