‘नकली राजकीय हिंदूत्ववाद्यांपासून सावध’… मिरारोड प्रकरणावर किरण मानेंची खास पोस्ट

अयोध्येत २२ फेब्रुवारी रोजी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. हा दिवस सगळ्यासाठा ऐतिहासिक दिवस होता.

‘नकली राजकीय हिंदूत्ववाद्यांपासून सावध’… मिरारोड प्रकरणावर किरण मानेंची खास पोस्ट

अयोध्येत २२ फेब्रुवारी रोजी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. हा दिवस सगळ्यासाठा ऐतिहासिक दिवस होता ,सोनेरी अक्षराने हा दिवस कायम एका पानावर लिहून ठेवावा असे क्षण आपण सगळ्यांनी अनुभवले .आणि या सुंदर दिवसाचे आपण साक्षीदार आहोत हे आपले सौभाग्यचं म्हणावे लागेल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादिवशी देशभरात उत्साहाचं वातावरण होतं. लोकांनी आपापल्या जिल्ह्यात, शहरात, गल्लोगल्ली रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा केला.

मात्र म्हणतातना सुंदर क्षणी कुठे तरी गालबोट हे लागतचं असंच काहीतरी घडलं असं म्हणावं लागेलं.तर यादिवशी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हिंदू-मुस्लीम वादाचा तो व्हिडिओ होता. तो व्हिडिओ मुंबईतील मीरारोड येथील असल्याचं व्हायरल होत होतं. अनेकांकडून तो व्हिडिओ मीरारोड येथील असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता अभिनेते किरण माने यांनी या व्हिडिओबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत किरण माने यांनी तो व्हिडिओ खोटा असल्याचं म्हणत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही त्यांनी लोकांना केलं आहे.

पोस्ट शेअर करत ते म्हणालेत भावांनो, मीरारोडचा तो व्हिडिओ फेक होता! नकली राजकीय हिंदूत्ववाद्यांपासून सावध रहा. २६ ऑगस्ट २०२२ चा हैदराबादमधला व्हिडिओ दाखवून मुस्लीमद्वेष पसरवणाचा केविलवाणा प्रयत्न होता तो. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण अस्सल मूलनिवासी हिंदू आहोत. प्रेमाने राहुया. अस्वस्थ व्हायचे असेल तर महागाई बेरोजगारीमुळे होऊया. धर्मद्वेषाने नाही.किरण माने यांची ही पोस्ट यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

दरम्यान, किरण माने अनेकदा सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात,कधी वादग्रस्त मुद्दे देखील मांडताना दिसून येत असतात. किरण माने यांनी आता शेअर केलेल्या फेक व्हिडिओबाबतच्या पोस्टवर अनेकांनी त्यांचं कौतुक करत महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिल्याचं तसंच त्यांच्याशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आता किरण मानेंची ही पोस्ट आता सगळीकडे व्हायरल देखील झाली आहे.

हे ही वाचा:

ठाकरे म्हणायचे  नोकरी मागणारे नाही तर… – CM EKNATH SHINDE

हिवाळ्यात कच्चे खोबरे खात आहात,तर शरीरासाठी आहे फायदेशीर,जाणुन घ्या फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version