‘सगळ्या टाकाऊ गोष्टी सामावून घेत’…किरण मानेंची महाराष्ट्राच्या राजकारणावर बोचक टीका

मराठमोळे अभिनेते किरण माने हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणा सध्या जी काही खिचडी बनते आहे.

‘सगळ्या टाकाऊ गोष्टी सामावून घेत’…किरण मानेंची महाराष्ट्राच्या राजकारणावर बोचक टीका

मराठमोळे अभिनेते किरण माने हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणा सध्या जी काही खिचडी बनते आहे.त्यावर त्यांनी भाष्य केले आहे.. अनेक राजकीय नेते पक्ष बदलताना दिसून येत आहेत.सध्या भाजपचं पारडं हे जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.दरम्यान अशातच दोन दिवसांपूर्वी एक मोठी बातमी समोर आली. इतकी वर्ष काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणारे नेते अशोक चव्हाण यांनी त्या पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपचा साथ धरली. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली होती.

 किरण माने यांनी या सर्व प्रकारावर नाव न घेता निशाणा साधला आहे. किरण मानेंची फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. फेसबुक वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण यांनी, “ते एक ड्रेनेज झालं आहे. सगळ्या टाकाऊ गोष्टी सामावून घेत आहे. लोकशाहीचं पोट ‘साफ’ होत आहे!” असे लिहिले.

किरण माने यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपामधील पक्षांतरानंतर  ही पोस्ट शेअर केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आले. यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी  वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच आपल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपा पक्षात प्रवेश केला. या पक्षांतरावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. अशोक चव्हाण पक्षांतर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.किरण माने यांनी देखील काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर ते अनेकदा सोशल मीडिया मार्फत राजकारणावर देखील व्यक्त होताना दिसले.

किरण माने यांची अशाप्रकारे व्यक्त व्हायची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आपल्याला न पटलेल्या गोष्टी सोशल मीडियावर ठामपणे व्यक्त केल्या होत्या. त्यावर बरेचदा त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. तर अनेकजण त्यांना समर्थन देखील दर्शवतात.किरण माने हे ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून घराघरात पोहचले. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मुळे ते अधिक प्रसिद्धि झोतास आले. या शोनंतर त्यांनी ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत भूमिका साकारली.

हे ही वाचा: 

Raj thackeray मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का देणार?

अंजीर पासून घरच्या घरी बनवा अंजीर हलवा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version