गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या सुरमय प्रवास

२००१ मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय १९६९ मध्ये पदमभूषण, १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि १९९९ मध्ये पदमविभूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या सुरमय प्रवास

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज दि. २८ सप्टेंबर रोजी जयंती आहे. जगभरातील चाहते आज लता दीदींना आदरांजली वाहत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. तर ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचा सुरमय प्रवास.

लतादीदींनी अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षांपासून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. वयाच्या १३ व्या वर्षी लताजींनी  आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्या भारतीय सिनेसृष्टीला आपल्या आवाजानं अखेरपर्यंत मंत्रमुग्ध केलं. आता यांनी १९४२ मध्ये मराठी चित्रपट ‘किती हसाल साठी’, ‘नाचू या ना खेडे सारी मणी हौस भारी’ हे पहिले गाणे गायले. हे गाणे सदशिवराव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केलं होत. लतादीदींनी १००० हुन अधिक गाणी हिंदी चित्रपटात गायन केले. लतादीदींनी आपल्या कारकिर्दीत ७ दशकांमध्ये १००० हुन अधिक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. तर ३६ हुन अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आहे. २००१ मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय १९६९ मध्ये पदमभूषण, १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि १९९९ मध्ये पदमविभूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.

वयाच्या १३ व्या वर्षी लतादीदींचे पितृछत्र हरपले. यावेळेस घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन ठेपली. लतादीदी आणि बहीण मीना मंगेशकर यांनी मुंबई गाठत मास्तर विनायक यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. १९४२ मध्ये पहिली मंगळागौर या चित्रपटात लतादीदींनी अभिनय केला. संगीतकार गुलाम हैदर यांनी १८ वर्षाच्या लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून शशिधर मुखर्जी यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली. गुलाम हैदर यांनी मजबूर या चित्रपटातील ‘अंग्रेजी चोर चला गया’ हे गाणे लतादीदींकडून गाऊन घेतले. हा लतादीदींना मिळालेला पहिला ब्रेक होता. यानंतर त्यांना कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. तसेच लतादीदी या १९७४ मध्ये लंडनच्या ‘रॉयल अल्बर्ट हॉल’ मध्ये सादरीकरण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. मी केवळ वडिलांमुळेच गाणे शिकू शकले असे लता मंगेशकर नेहमी सांगत आल्या.

हे ही वाचा:

PM Modi Pune Visit Cancelled: मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा Pune दौरा रद्द

Mumbai Rain Incident: मुसळधार पावसात उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू, जबाबदार कोण?
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version