spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Koffee With Karan Episode 10 : आलिया भट्टच्या एका कमेंटवर कतरिना कैफने ‘सुहागदीन’ कल्पना सुचवली

अभिनेत्री कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे कलाकार या गुरुवारी कॉफी विथ करणच्या १० व्या भागात एकत्र दिसणार आहेत. करण जोहरने नव्या एपिसोडचा प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘फोन भूत’ या हिंदी आगामी चित्रपटासाठी हे तिन्ही कलाकार करणच्या शोमध्ये प्रमोशनसाठी आले आहेत.

सिनेमा विषयी गप्पा झाल्या नंतर कारणने त्याच्या प्रश्नाची फेरी चालू केली, यात त्याने कतरिनाला विचारले, आलिया भट्ट जेव्हा शोमध्ये तेव्हा तिने एक व्यक्तव्य केले, ‘लग्नाच्या रात्री काहीही करण्यास खूप थकली होती’ याच संधर्भात करणने कतरिनाला प्रश्न विचारला असता ती म्हणाली,’ “हि सुहागदीन का होऊ शकत नाही,” कतरिनाच्या या टिपणी नंतर सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरच्या भुवया उंचावल्या.

करणने इशान खट्टरला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की तो सिंगल आहे. सिद्धांतने विनोद केला की तो इतका सिंगल आहे, त्याच्या कंपनीत इशानही सिंगल झाला आहे. त्यानंतर करणने कतरिनाला विचारले की लेटेस्ट थर्स्ट ट्रॅप्स कोणाकडे जाते. ती म्हणाली, “अलीकडे मी रणवीर सिंगच्या पेजवर जात आहे.” तिघांनीही करणसोबत अनेक खेळ खेळले.

यावर्षी पाहुणे म्हणून आलिया भट्ट, रणवीर सिंग, अक्षय कुमार, समंथा रुथ प्रभू, जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आमिर खान, करीना कपूर, शाहिद कपूर, कियारा अडवाणी, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन, अर्जुन कपूर आणि सोनम कपूर.यांनी आता पर्यंत हजेरी लावली आहे.

हेही वाचा : 

ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर ‘या’ अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच झळकणार

गोव्यात काँग्रेसच्या मनात धडकी, काँग्रेसचे ८ आमदार भाजपचा हात धरण्याची शक्यता

Latest Posts

Don't Miss