New Year celebration साठी कोहली कुटुंब पोहोचलं दुबईला,अनुष्का विराटचे आणि वामिकाचे सुंदर फोटो आले समोर

अनुष्काच्या या फोटोमध्ये दुबईच्या चांदण्या रात्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकत्र दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता.

New Year celebration साठी कोहली कुटुंब पोहोचलं दुबईला,अनुष्का विराटचे आणि वामिकाचे सुंदर फोटो आले समोर

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिचा फॅमिली क्रिकेटर विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत दुबईत आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी विरुष्काची जोडी दुबईला पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, नवीन वर्ष २०२३च्या सेलिब्रेशनपूर्वी, अनुष्का शर्माने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

अनुष्का शर्माने लेटेस्ट फोटो केला शेअर

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही जोडी बी-टाऊनची सर्वात आवडती जोडी मानली जाते. विरुष्काचे चाहते अनेकदा सोशल मीडियावर या जोडप्याच्या ताज्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतेच अनुष्का आणि विराट नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी दुबईत पोहोचले आहेत. दरम्यान, अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. अनुष्काच्या या फोटोमध्ये दुबईच्या चांदण्या रात्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकत्र दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता.

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटचा विचार करा, अनुष्का गेल्या ५ वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण, पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये ती तिच्या होम प्रोडक्शन चित्रपट ‘चकडा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून यात अनुष्का झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामी हिचे नाव सर्वात वेगवान महिला गोलंदाजांमध्ये घेतले जाते. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का शर्मा आणि विराटने २०१७ मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते. दोघेही गेल्या वर्षी मुलगी वामिकाचे पालक झाले.

हे ही वाचा:

Cristiano Ronaldoने नव्या फुटबॉल क्लबशी केला करार, १७०० कोटींहून जास्त असणार वार्षिक वेतन

बॉयकॉटमुळे फ्लॉप ठरलेला Laal Singh Chaddha पुन्हा का होतोय सोशल मीडियावर ट्रेंड?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version