Shubhvivah मालिकेत कुंजिका काळविंट साकारणार भन्नाट पात्र, नव्या वर्षात दमदार सुरुवात

स्टार प्रवाह (star pravah) वाहिनी नेहमी प्रेक्षकांसाठी आगळा वेगळा विषय घेऊन मनोरंजन (entertainment ) करण्यास नेहमी पुढे असते. या वाहिनीवरील सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद असतो.

Shubhvivah मालिकेत कुंजिका काळविंट साकारणार भन्नाट पात्र, नव्या वर्षात दमदार सुरुवात

स्टार प्रवाह (star pravah) वाहिनी नेहमी प्रेक्षकांसाठी आगळा वेगळा विषय घेऊन मनोरंजन (entertainment ) करण्यास नेहमी पुढे असते. या वाहिनीवरील सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद असतो. यासोबत प्रेक्षकांचे संपूर्ण दिवस मनोरंजन करण्याची जबाबदारी आता स्टार प्रवाहाने घेतली आहे. मुरंबा आणि लग्नाची बेडी या दोन मालिकांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रेक्षकांसोबत असलेले हे नाते अजून घट्ट करण्यासाठी स्टार प्रवाह घेऊन येत आहे एक नवी कोरी मालिका. शुभविवाह हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या मालिकेचा टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझर प्रदर्शित होताच सर्वांनीच टीझरच भरभरून कौतुक केले आहे. प्रेक्षकही मालिका सुरु होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

शुभविवाह (shubhvivah) हि दोन सावत्र बहिणींची गोष्ट आहे. शुभविवाहमध्ये दमदार विषय आणि वेगळी संकल्पना घेऊन स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहाने नुकताच हा टिझर प्रदर्शित केला असून या मालिकेत कुंजिका काळविंट नवीन आणि आगळी वेगळी खलनायकाची भूमिका साकारणार आहे. कुंजिका तिच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाली, हि भूकिक मला नव्या वर्षात नवीन संधी घेऊन आली आहे. मी या मालिकेत पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. पौर्णिमा या पात्राकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी मालिकेत खलनायिका साकारणार याचा अंदाज प्रेक्षकांना पहिला प्रोमो पाहूनच आला असेल. खरतर नकारात्मक भूमिका साकरताना खूप कस लागतो. मालिकेत हे पात्र पुढे काय करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता असते.

या मालिकेत उत्कृष्ट अशी स्टार कास्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. लेखक दिग्दर्शक संतोष पाटील (santosh patil )यांनी हि मालिका दिग्दर्शित केली आहे. मालिकेत मधुरा देशपांडे (madhura deshpande), यशोमन आपटे ( yuashoman apte) , कुंजिका काळविंट (kunjika kalwint) प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच शुभविवाह हि मालिका १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे.

हे ही वाचा:

रतन टाटा यांचे निकटवर्तीय R. K. Krishna Kumar यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला झाली सुरुवात

राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version