spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कुशल बद्रिके गाजवणार हिंदी विनोदी शो,प्रोमो झाला आउट श्रेया बुगडेच्या नावाची वर्णी

छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला विनोदवीर कुशल बद्रिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला विनोदवीर कुशल बद्रिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.कुशलचं या कार्यक्रमामुळे खरतर नशीब फळफळलं असं म्हणायला काहीचं हरकत नाही.विविध सिनेमांमधून कुशलने त्याच्या अभिनयाचा ठसा तर उमटवलाच होता, पण ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी रिअॅलिटी शोने त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. दरम्यान कुशल आता एका लोकप्रिय हिंदी चॅनेलवरील विनोदी शोमध्ये दिसणार असून त्याचा प्रोमोही समोर आला आहे.कुशलने या कार्यक्रमासोबतच अनेक चित्रपटांमध्ये काम करत देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

कुशल लवकरच सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात कुशल बद्रिके महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. त्याच्यासह हिंदी मनोरंजन जगतातील अनेक विनोदवीर या कार्यक्रमात दिसणार आहेत. ‘मॅडनेस मचायेंगे’ हा शो सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ची जागा घेईल असे बोलले जाते आहे. सध्या या कार्यक्रमाच्या वेळेत ‘इंडियन आयडॉल’ आणि ‘झलक दिखला जा’ हे कार्यक्रम ऑन एअर जात आहेत.

दरम्यान ‘मॅडनेस मचायेंगे’ कधीपासून प्रसारित होईल, याची तारीख मात्र अद्याप सांगण्यात आलेली नाही. या शोमध्ये हुमा कुरेशी सुत्रसंचालनाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  तिच्यासह कॉमेडियन हर्ष गुजरालही या शोमध्ये आहे. दरम्यान कुशलसह अंकिता श्रीवास्तव, गौरव दुबे, केतन सिंग, पारितोष त्रिपाठी, स्नेहिल मेहरा, इंदर सहानी हे कलाकार पाहायला मिळतील. या कार्यक्रमाचा एक प्रोमोही समोर आला आहे. दरम्यान सोनी टीव्हीने शेअर केलेल्या ‘मॅडनेस मचायेंगे’च्या प्रोमोमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे जरी दिसली नसली तरी तिला या पोस्टमध्ये टॅग करण्यात आलं आहे. त्यामुळे कुशलसोबतच या शोमध्ये श्रेया बुगडेच्या नावाची देखील वर्णी लावण्यात येत आहे. . या कार्यक्रमाचे स्वरुप काय असणार आहे, हेदेखील अद्याप समोर आलेले नाही. प्रेक्षकांचे दोन लाडके मराठी कलाकार या कार्यक्रमात असल्यामुळे, ‘मॅडनेस मचायेंगे’  या शोमध्ये डब्बल धमाका पाहायला मिळणार आहे.त्यामुळे  प्रेक्षक या कर्यक्रमासाठी उत्सुक आहेत.

हे ही वाचा: 

प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीवर खासदार संजय राऊत यांनी केला गौप्यस्फोट

भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली; विनायक राऊतांनी केली भाजपवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss