spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सिद्धार्थ जाधव,भूषण प्रधान आणि मयुरी देशमुखच्या ‘लग्नकल्लोळ’चे धमाकेदार टिझर प्रदर्शित

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान आणि मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे.

या नवीन वर्षात विविध विषयावर भाष्य करणारे एकापाठोपाठ एक मराठी चित्रपट भेटीला येत आहेत.मराठी चित्रपटांसाठी प्रेक्षकवर्गांचा कल वाढला आहे.अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार बॅटिंग करत आहेत.अशातच आता मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान आणि मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे.काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.त्यानंतर आता या चित्रपटाचं जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणार, हे नक्की! टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका १ मार्चला उडणार आहे.

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे, आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, मोहम्मद बर्मावाला म्हणतात, ” चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्न म्हटले की घरात  कल्लोळ हा आलाच. परंतु हा कल्लोळ जरा वेगळा आहे. यात ट्विस्ट आहे. हा कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाचा खजिना आहे.’’

दरम्यान या चित्रपटात सिद्धार्थ जाधव असल्याने प्रेक्षकांसाठी कॉमेडीची पर्वणीचं पाहायला मिळणार आहे.एकंदरीत या चित्रपटाचं पोस्टर पाहुन हा लग्नावर आधारित चित्रपट असल्याचं दिसून येत आहे.दरम्यान आता या चित्रपटातील हे उत्कंठा आपल्याला चित्रपट पाहल्यानंतरच समझणार आहे.त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.दरम्यान आता लग्नकल्लोळ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला जम बसवायला यशस्वी ठरणार का ? हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss