spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lal Singh Chadhdha: आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा होणार OTT वर रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

जर तुम्ही आमिर खान आणि करीना कपूरचे चाहते असाल आणि कोणत्याही कारणास्तव तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये 'लाल सिंग चड्ढा' पाहता आला नसेल, तर घाबरण्याची गरज नाही

आमिर खान आणि करीना कपूर स्टारर ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच खूप चर्चेत होता. हा चित्रपट ११ ऑगस्टला रक्षाबंधनासोबत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ द्वारे पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचेही सांगण्यात आले. पण आता २ महिन्यांतच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

या OTT प्लॅटफॉर्मवर आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज होणार…

नेटफ्लिक्सने आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत आणि हा चित्रपट आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आहे. खुद्द नेटफ्लिक्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आमिर खानच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सने ट्विट करून लिहिले, ‘तुमचे पॉपकॉर्न नाही गोलगप्पा तयार ठेवा कारण लाल सिंग चड्ढा आता रिलीज झाला आहे. म्हणजेच, जर तुम्ही आमिर खान आणि करीना कपूरचे चाहते असाल आणि कोणत्याही कारणास्तव तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ पाहता आला नसेल, तर घाबरण्याची गरज नाही कारण आता तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

आमिर खानला त्याच्या जुन्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संतापाचा सामना करावा लागला होता. ज्याचा परिणाम चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच कलेक्शनवरही दिसून आला. लोकांचा आलेला कमी प्रतिसाद पाहता हा चित्रपट अनेक थिएटर्समधून काढून टाकण्यात आला, तर ४०० कोटींची कमाई करणारा आमिर खानचा हा चित्रपट ५८.७३ कोटींवर घसरला. आमिर खानचा हा चित्रपट हॉलिवूड अकादमी पुरस्कार विजेत्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या कथेलाही लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर यांच्याशिवाय नागा चैतन्य आणि मोना सिंग यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंह चड्ढा’ काही खास कामगिरी करू शकला नाही, पण आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की मिस्टर परफेक्शनिस्टचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कितपत आपला प्रभाव पाडतोय.

हे ही वाचा:

KBC 14 Birthday Special : केबीसीच्या मंचावर जया बच्चन नेमकं काय बोलल्या?, ज्यामुळे बिग बी रडले, पाहा व्हिडिओ

Cough Syrup: गांबियातील ६६ मुलांच्या मृत्यूमुळे WHO ने दिला ‘ या ‘ चार कफ सीरप्सबद्दल अलर्ट जारी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss