spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lalbaugcha Raja चरणी ‘राजा राणी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण, १८ ऑक्टोबरपासून जवळच्या चित्रपटगृहात

आजवर प्रेम प्रकरणावर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत सत्य घटनेवर आधारित आणखी एक प्रेम कहाणी भर घालण्यास सज्ज होत आहे. ही प्रेम कहाणी म्हणजे 'राजा राणी' हा चित्रपट होय.

आजवर प्रेम प्रकरणावर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत सत्य घटनेवर आधारित आणखी एक प्रेम कहाणी भर घालण्यास सज्ज होत आहे. ही प्रेम कहाणी म्हणजे ‘राजा राणी’ हा चित्रपट होय. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘राजा राणी’ चित्रपटात मराठमोळा, सर्वांचा लाडका सूरज चव्हाण झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या पोस्टरचं लालबागच्या राजाच्या चरणी अनावरण करण्यात आलं. यावेळी चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे, अभिनेता रोहन पाटील, सह निर्माते कार्तिक दोलताडे व टीम उपस्थित होती.

यावेळी लालबागच्या राजाचे दर्शन घेत हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात ३०० हुन अधिक चित्रपट गृहात प्रदर्शित होणार असल्याचेही सांगितले. ग्रामीण व सत्य प्रेमकहाणी वर आधारित असलेल्या चित्रपटाची सर्वत्र उत्सुकता रंगली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे झळकणार असून सध्या ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात धुमाकूळ घालणाऱ्या गुलीगतचा दणकाही पाहायला मिळणार आहे.
सूरज आता सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या या प्रेम कथेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सूरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे.

या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा ‘राजा राणी’ हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

Latest Posts

Don't Miss