नायक – नायिकेच्या भूमिकेत पुन्हा एकत्र दिसणार ललित – मृण्मयी

जपानमधील चित्रीकरण आणि मराठी कथा यांचा संगम असणाऱ्या, ‘तो, ती आणि फुजी’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

नायक – नायिकेच्या भूमिकेत पुन्हा एकत्र दिसणार ललित – मृण्मयी

चि व चि.सौ.का फेम अभिनेत्री मृण्मयी गोडबोले आणि ललित प्रभाकर मराठी कथा आणि जपानमधील चित्रीकरण यांचा संगम असणाऱ्या, ‘तो, ती आणि फुजी’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाची पटकथा लेखिका इरावती कर्णिक यांनी लिहिली असून, मिडीयम स्पायसी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारा मराठी, हिंदी रंगभूमीवरचा प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित टाकळकर याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन्ही प्रेमी, विवाह नंतर त्यांच्या नात्यात आलेली कटुता आणि एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर सात वर्षांनी जपानमध्ये झालेली दोघांची पुनर्भेट अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे.

या चित्रपटाची निर्मिती चाकोरीबद्ध चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा ठेवणाऱ्या शिलाआदित्य बोरा यांनी केली आहे. “२०१९ मध्ये क्योटोमध्ये झालेल्या ‘फिल्ममेकर्स लॅब’ मध्ये मी सहभागी झालो होतो त्यावेळी जपानी भाषेत लघुपट करताना मला तिथल्या निसर्ग सौंदर्याने भुरळ घातली. त्यावेळी भविष्यात जपान मध्ये घडणारी कथा चित्रपटात मांडायचे असा निर्धार मी केला”, असे बोरा यांनी सांगितले तसेच सध्या प्रादेशिक चित्रपटांना हिंदी पेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याने मराठी चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे, बोरा यांनी स्पष्ट केले आहे.

‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, कोलाड, टोकियो, क्योटो आणि माउंट फुजी इथे होणार असून हा मराठी – जपानी चित्रपट १७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

 

Exit mobile version