Lata Mangeshkar: लतादीदी पाहायला मिळणार ‘या’ डॉक्युमेंटरीमार्फत

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज जयंती आहे. जगभरातील चाहते आज लता मंगेशकर यांना आदरांजली वाहत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला.

Lata Mangeshkar: लतादीदी पाहायला मिळणार ‘या’ डॉक्युमेंटरीमार्फत

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज जयंती आहे. जगभरातील चाहते आज लता मंगेशकर यांना आदरांजली वाहत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. कित्येक दशकं त्यांनी आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. आजही त्यांची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. लता दीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार मयुरेश पै हे करणार आहेत.

लतादीदींच्या जन्मदिनी अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स आणि लतिका क्रिएशन्स हे सम्राज्ञी या माहितीपटाची निर्मिती करणार आहेत. लतादीदींचा जीवनपट उलगडणारी ही डॉक्युमेंटरी असणार आहे. मराठीतील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे.एल एम म्युझिकचे सीईओ -संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) या दोघांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे. ही डॉक्युमेंट्री मयुरेश पै (Mayuresh Pai) दिग्दर्शित करत आहेत. स्वरसम्राज्ञीला या कलाकृतीतून मानाचा मुजरा करण्याचा हा प्रयत्न आहे.

लता मंगेशकर यांचा जन्म इंदोरमध्ये झाला होता. २८ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म इंदोर येथील शिख गल्लीमधील एका चाळीमध्ये झाला. लतादीदी सात वर्षांपर्यंत तिथेच वास्तव्यास होत्या. त्यानंतर मंगेशकर कुटुंब महाराष्ट्रात आलं. लता मंगेशकर यांनी जगातील ३६ भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाची जादू रसिकांच्या मनावर होती आणि यापुढेही कायम राहील.

हे ही वाचा:

Deadpool 3: डेडपूलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! २०२४ मध्ये रिलीज होणार तिसरा भाग

Festival holidays : बच्चे पार्टीसाठी खुशखबर, ऑक्टोबर महिना घेऊन येतोय तब्बल १० दिवसांची शालेय सुट्टी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version