लयभारी दिसते पोर! मराठमोळ्या रोमँटिक गाण्याचीच हवा, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन प्रेमीयुगुलांची पसंती, घरच्यांचा होकार ते लग्न अस एकंदरीत परिपूर्ण प्रेम असणाऱ्या जोडीच्या धमाकेदार आणि नखरेल गाण्याने सर्वत्र धमाका केला आहे. साऱ्यांचं लक्ष केंद्रित करुन थिरकायला लावणार हे गाणं म्हणजे 'लयभारी दिसते पोर' (Lay Bhari Diste Por).

लयभारी दिसते पोर! मराठमोळ्या रोमँटिक गाण्याचीच हवा, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Lay Bhari Diste Por Song : प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन प्रेमीयुगुलांची पसंती, घरच्यांचा होकार ते लग्न अस एकंदरीत परिपूर्ण प्रेम असणाऱ्या जोडीच्या धमाकेदार आणि नखरेल गाण्याने सर्वत्र धमाका केला आहे. साऱ्यांचं लक्ष केंद्रित करुन थिरकायला लावणार हे गाणं म्हणजे ‘लयभारी दिसते पोर’ (Lay Bhari Diste Por). मराठमोळ्या साज शृंगाराने सजलेल्या प्रेयसीचं कौतुक करण्यात व्यस्त असलेल्या प्रियकराची अनोखी कथा या गाण्यातून उलगडताना पाहणं रंजक ठरत आहे. या गाण्यातून दोन प्रेमीयुगुल त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी सांगत साऱ्यांना थिरकायला भाग पाडत आहेत. एकूणच हे रोमँटिक (Romantic Song) आणि धमाकेदार गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

या गाण्यातून अभिनेत्री हिंदवी पाटील आणि अभिनेता जगदीश झोरे (Actress Hindvi Patil and actor Jagdish Zore) ही जोडी एकमेकांच्या प्रेमात बेधुंद झालेली पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या मराठमोळ्या swag असलेल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यांना थिरकायला भाग पाडलं आहे. “साज मराठमोळा लयभारी, लयभारी दिसते पोर” असे बोल असणारं हे रोमँटिक गाणं चर्चेत आलं आहे. गाण्यात दोन्ही कलाकाराचा मराठमोळा लूकही लक्ष वेधून घेत आहे.

‘साईरत्न एंटरटेनमेंट’ प्रस्तुत या नव्याकोऱ्या गाण्याच्या निर्मितीची धुरा संदेश गडेकर आणि सुरेश गाडेकर (Sandesh Gadekar and Suresh Gadekar) यांनी सांभाळली आहे. तर संगीतकार म्हणून ओमकार रणधीर (Omkar Randhir) याने बाजू सांभाळली आहे. तर हर्षवर्धन व्हावरे आणि सोनाली सोनावणे यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. तर संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि स्क्रीनप्लेची दुहेरी धुरा मनीष महाजन यांनी योग्यरीत्या पेलवली आहे. गाणं प्रदर्शित होऊन अवघे तीन दिवस झाले असून हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं असून अनेकजण या गाण्याला पसंती दर्शविताना दिसत आहेत.

Gold Silver Rate Today : पितृपक्षातील या’ तिथीला सोने आणि चांदी खरेदी करणे मानले जाते शुभ त्याबद्दल माहिती आहे का तुम्हांला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version