साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘Leo’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

साऊथ सुपरस्टार थलापती विजयचा आज २२ जून रोजी ४९ वा वाढदिवस आहे. या त्याच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या आगामी चित्रपटाचा(‘लिओ’) फर्स्ट लूकचे पोस्टर प्रदर्शित केले आहे

साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘Leo’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे ,थलापती विजय ज्याला तुम्ही ओळखतच असाल. एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारा विजय कोटींमध्ये कमाई करतो. वयाच्या १० वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेला विजय प्रत्येक भूमिकेशी स्वतःला जुळवून घेतो.त्यातच आता त्याचा बहुचर्चित आगामी चित्रपट ज्याचे तात्पुरते टायटल ‘थलापथी ६७’ (Thalapathy 67) असे ठेवण्यात आले होते, याचे ऑफिशल टायटल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अशातच, प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेत, निर्मात्यांनी अखेरीस या चित्रपटाचे टायटल ‘लिओ’ (Leo) आहे असे जाहीर केले आहे.

साऊथ सुपरस्टार थलापती विजयचा आज २२ जून रोजी ४९ वा वाढदिवस आहे. या त्याच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या आगामी चित्रपटाचा(‘लिओ’) फर्स्ट लूकचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.या पोस्टरमध्ये विजय अत्यंत थरारक लूक मध्ये दिसत आहे.या चित्रपटात विजयसोबत बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात विजय व संजयदत्तसोबत त्रिशा,अर्जुन,प्रिया आनंद,गौतम वासुदेव मेनन यांच्याही महत्वाच्या भूमिका दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन (director)लोकेश कनागराज यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती (producer)एसएस ललित कुमार यांनी केली आहे.

मेकर्सने (makers)नेहमीच चित्रपटाशी संबंधित अपडेट्स प्रेक्षकांना दिले आहेत. या चित्रपटात संजय दत्त नकारात्मक (negative)भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात विजय हा ४० व्या शतकातील गॅंगस्टरच्या (gangster) भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.या चित्रपटाचा फर्स्ट लूक (first look)पाहून चाहतेवर्ग या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाचे पहिले गाणे लवकरच प्रदर्शित होण्याची माहित दिली होती. त्यातच आता या चित्रपटाचे पहिले गाणे विजयच्या वाढदिवसानिमित्त आज २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच रिलिज झालेल्या या पोस्टरमध्ये विजय हातात रक्ताने माखलेला हॅमर (hammer)घेऊन दिसत आहे.विजयचा लिओ (leo)हा चित्रपट १९ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

योगादिनाचे औचित्य साधत प्राजक्ताने घातले १०८ सूर्यनमस्कार…

लोअर परेलमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version