Thursday, July 4, 2024

Latest Posts

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला, अशोक सराफ – माधव अभ्यंकर यांच्यात रंगणार पराकोटीचा संघर्ष

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा ‘लाईफ लाईन’ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर दिसत असून अशोक सराफ यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप आणि माधव अभ्यंकर यांच्या गळ्यातील तुळशीमाळ यावरून या दोघांमधील मतभेदाचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. मात्र हा मतभेद कोणत्या कारणावरून आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे.

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, या चित्रपटात हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते आहेत लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट. राजेश शिरवईकर यांची कथा, पटकथा, संवाद आणि गीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे. ‘लाईफ लाईन’ हा चित्रपट ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी आहे.

‘लाईफ लाईन’ चे तरुण दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, “अतिशय नाजूक विषय असल्यामुळे अतिशय संवेदनशीलरित्या आम्ही तो मांडला आहे. विज्ञान आणि जुन्या परंपरा यात नेहमीच तफावत राहिलेली आहे. प्रत्येकाची विचारसरणी बदलणारा ‘लाईफ लाईन’ आहे. कथानक, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.”

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss