spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Liger OTT Release : जाणून घ्या…ओटीटीवर नक्की कधी पाहू शकणार ‘लायगर’

अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा 'लायगर' हा चित्रपट सर्वञ २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता.

अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा ‘लायगर’ हा चित्रपट सर्वञ २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला फारसे यश हे मिळाले नाही. परंतु आता हा चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला जास्त यश हे मिळाले नाही. परंतु आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. आतापर्यंत जवळपास या चित्रपटानं जवळपास ६६ कोटींची कमाई केली आहे. लायगर हा चित्रपटाची निर्मिती ९० कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. पुरी जगन्नाथ, करण जोहर आणि चार्मे कौर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबतच रोनित रॉय, रम्या कृष्णन, मकरंद देशपांडे आणि विश रेड्डी या कलाकारांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी ‘लायगर’ या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. आता ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल? या प्रश्नाचं लवकरच उत्तर मिळेल.

 आज दि २२ सप्टेंबर रोजी लायगर हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लायगरचं पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन ओटीटीवर कधी रिलीज होणार आहे? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

‘या’ ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२२ असणार लाईव्ह

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार – अनिल परब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss