spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बहुप्रतिक्षित ‘लायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित; विजय देवराकोंडा ॲक्शन मोडमध्ये

या चित्रपटाद्वारे विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या लायगर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. चित्रपटात विजय देवरकोंडा एका किकबॉक्सरच्या भूमिकेत दिसतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच टॉलिवूड आणि बॉलिवूड एकत्र पहायला मिळणार आहे.

हेही वाचा

धनुषचा अनोखा अंदाज; पारंपरिक वेशानं वेधलं सर्वांचं लक्ष

चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल म्हणायचे झाले तर, ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडा जबरदस्त ॲक्शन मोड मध्ये दिसत आहे. विजय किकबॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये विजय अडखळत मोजके संवाद म्हणताना दिसतोय. ट्रेलरमध्ये अनन्या आणि विजयचा रोमान्सही पहायला मिळतो. महत्वाचं म्हणजे मराठमोठा अभिनेता मकरंद देशपांडे आणि अमेरिकन किक बॉक्सर माइक टायसन देखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.

 

तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव असलेल्या दक्षिणेतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी लायगरचे दिग्दर्शन केले आहे. विजय लायगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर अनन्या या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ट्रेलर पाहून कळत आहे की हा एक मनोरंजनाने भरपूर असलेला चित्रपट आहे. त्याव्यतिरिक्त चित्रपटात रोमान्स आणि ॲक्शन पाहायला मिळणार आहे. 25 ऑगस्टला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत प्रदर्शित करण्यात आलेले व्हिडिओ आणि पोस्टर पाहून लक्षात येतं की, विजयने या व्यक्तिरेखेसाठी किती मेहनत घेतली आहे.

Latest Posts

Don't Miss