spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदिपुरुषनंतर आता भगवान महादेवावर येणार नवीन चित्रपट

आदिपुरुषनंतर एक नवीन पौराणिक चित्रपट लोकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'लव्ह यु शंकर'.नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

आदिपुरुष हा चित्रपट भारतातील हिंदी पौराणिक चित्रपट असून या चित्रपटाची सध्या खूप चर्चा होत आहे. चित्रपट रिलिज झाल्यापासूनच चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही गोष्टींमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे . चित्रपट रिलिज झल्यापासून सोशल मीडियावर तो भारीच ट्रोल होताना दिसत आहे. तसेच या चित्रपटातील क्रिती सनोन आणि प्रभासच्या जोडीलाही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिल. पण चित्रपटातील VFX, कलाकरांचा लूक, सिनेमाची कथा अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या आहेत. अश्यातच आता आदिपुरुषनंतर एक नवीन पौराणिक चित्रपट लोकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘लव्ह यु शंकर’.नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

 

भगवान शिवशंकराना अनेक नावाने ओळखले जाते. जसे शिवभोले ,शंकर, भोलेनाथ. भगवान शंकराचे अनेक भक्त भारतात पाहायला मिळतात.अश्याच भक्तांच्या भेटीला हा नवीन चित्रपट येत आहे. याआधीही शिवशंकरांवर अनेक मालिका व चित्रपट बनवण्यात आले होते. त्यातच आता ‘लव्ह यु शंकर हा ऍनिमेटेड बॉलीवूड चित्रपट रिलिज होण्यासाठी सज्ज झाला आहे.आता शिवशंकरची कथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून २२ सप्टेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव एस रुईया यांनी केले आहे.तसेच चित्रपटातील पात्रांबद्दल बोलायचे झाले तर तनिषा मुखर्जी, संजय मिश्रा, श्रेयस तळपदे, मान गांधी, अभिमन्यू सिंग आणि पात्रिक जैन असे दिग्गज कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, कोणता स्टार कोणती भूमिका साकारणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुनीता देसाई या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. या चित्रपटात एक ८ वर्षांचा मुलगा आणि शिवशंकर दिसणार आहेत. पूर्ण कथा हि या दोघांभोवती फिरताना दिसेल.या ८ वर्षीय मुलाची भगवान शिव यांच्यावर नितांत भक्ती असते. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड अशा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

हे ही वाचा:

थंडीच्या दिवसात पायांची काळजी घेण्यासाठी ‘या’ Super Homefood चा करा वापर

Rani Lakshmibai, काय होते झाशीच्या राणीचे मृत्यूपूर्वीचे विधान?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss