‘Photon in a double-slit’ हे वाक्य सर्वांनाच माहित असेल. नसेल माहित तर काही हरकत नाही. याचा अर्थ असा की फोटॉन म्हणजे एक किरणाचा सर्वात छोट्यातला छोटा कण आहे. खरतर ‘Photon in a double-slit’ हा एक सिद्धांत आहे ज्यात प्रकाशाचा कण हा दोन वेगवेगळ्या दरवाजातून पुढे जातो पण माणसाच्या डोळ्यांना तो एकच कण आहे असा भास होतो. खरतर या सिद्धांताचा उद्गार काढण्याचे कारण म्हणजे ही थियरी एका हुशार, बुद्धिमान तसेच अष्टपैलू कलाकार म्हणजेच सुशांत सिंह राजपूत यांच्या जीवनाशी निगडित आहे. हा अभिनेता कालच्या ओघात दिगंतात प्राप्त झाले आहेत. परंतु ते त्यांच्या अभिनयाने प्रत्येक रसिकप्रेक्षकाच्या मनांत अधिराज्य गाजवत आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या जीवनकाळ हा फार कमी वर्षांचा होता. परंतु त्यांनी या कमी वेळाच्या कारकिर्दीत फार कमी चित्रपट बनवले. पण ते प्रत्येक चित्रपट आणि त्यात केलेला अभिनय लोकांच्या सतत लक्षात राहिला आहे. जणू त्यांचं आयुष्य म्हणजे “बाबूमुशाय जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही” या चित्रपटातील या वाक्य प्रमाणे होते. त्यांनी केलेल्या चित्रपटांपैकी सर्वात जास्त गाजलेला चित्रपट म्हणजे M.S. Dhoni The Untold Story हा चित्रपट. या चित्रपटाने धोनी यांचे आणि सुशांत या दोहोंचे आयुष्य बदलूनच गेले. या चित्रपटामुळे दोहोंचे फॅन्स खूप खुश झाले होते. आता त्यांच्या सर्व चाहत्यांना फार आनंदाची अशी खुशखबर आली आहे. ज्यामुळे यांचा आनंद गगनात मावेना असा होणार आहे.
ती खबरबात म्हणजे सुशांत व धोनी यांच्या चाहत्यांच्या आवडीचा असा असणारा चित्रपट म्हणजे M.S. Dhoni The Untold Story The Untold Story हा आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला थेट चित्रपटगृहात येणार आहे. सुशांत यांनी सिनेमात साकारलेली धोनीची भूमिका अक्षरशः जे जगले होता हा सिनेमा आज ५ जुलैपासून पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होतोय. ९ जुलैला असलेल्या धोनी यांच्या वाढदिवसानिमित्त हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ५ जुलै ते ११ जुलै २०२४ या कालावधीत पीव्हीआर आयनॉक्स थिएटर्समध्ये हा सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित केला जातोय सुशांत आणि धोनी यांच्या फॅन्ससाठी ही आगळी-वेगळी पर्वणीच असणार आहे यात शंकाच नाही.
M.S. Dhoni The Untold Story The Untold Story या चित्रपटाविषयी थोडक्यात पण आवडेल असं :
सध्या देशभरात क्रिकेटचा चांगला माहोल आहे. अलीकडेच भारतीय संघाने विश्वचषक T20 ट्रॉफी जिंकली. याशिवाय धोनीचा वाढदिवस आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि सिनेप्रेमी रसिकांना MS Dhoni The untold story सिनेमा पाहून पुन्हा एकदा मजा येईल यात शंका नाही. या सिनेमात सुशांतने माहीची प्रमुख भूमिका साकारलेली या शिवाय कियारा अडवाणी, दिशा पाटनी, अनुपम खेर, भूमिका चावला, राजेश शर्मा कुमुद मिश्रा अशा कलाकारानी सिनेमात साकारलेल्या भूमिका लोकांच्या विशेष स्मरणात राहिल्या आहेत. हा चित्रपट पुन्हा थिएटरवर येणार म्हंटल्यावर रसिकप्रेक्षक आणि चाहते यांचा आनंद हा द्विगुणित झाला आहे.
हे ही वाचा: