spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मधुबाला’चा बायोपिक लवकरच  रुपेरी पडद्यावर,कोण साकारणार भूमिका ?

आपल्या निखळ सौंदर्याने आणि मनमोहक हास्याने अनेकांना भुरळ पाडणारी  दिवंगत अभिनेत्री म्हणजे मधुबाला.मधुबालाने हिंदी चित्रपटसृष्टी चांगलीच गाजवली.

आपल्या निखळ सौंदर्याने आणि मनमोहक हास्याने अनेकांना भुरळ पाडणारी  दिवंगत अभिनेत्री म्हणजे मधुबाला.मधुबालाने हिंदी चित्रपटसृष्टी चांगलीच गाजवली.ज्या काळात सोशल मीडिया सारखे माध्यमे नसताना ही मधुबालाचे लाखो चाहते होते.आपल्या निरागस अभिनयातून त्यांनी लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं. अभिनय, सौंदर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व या गुणांमुळे त्या आजही सर्वाधिक लोकप्रिय नायिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.यातच चित्रपटसृष्टीत बरेच बायोपिक सध्या बनत आहेत अन् आणखी काही बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान आता ‘मधुबाला’ यांच जीवनचरित्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.त्यामुळे आता प्रेक्षकांची उस्तुकत्ता शिगेला पोहचली आहे.

सध्या अनेक बायोपिक मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. यामधील अनेक चित्रपट हे सध्या बॉक्स ऑफिसवरही यश मिळवतायत. हिंदीसह मराठीतही बायोपिकची मालिका सुरु आहे. नुकतच मराठी सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर प्रद४शित करण्यात आला. त्यातच नुकतच कंगना राणौत मुख्य भूमिकेत असलेल्या ‘एमर्जन्सि’ या चित्रपटाची देखील जोरदार चर्चा होती. आता मधुबालाच्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोनी पिक्चर्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलीये. मागील काही काळामध्ये मधुबाला यांचा बायोपिक येणार असल्याचं म्हटलं जात होतं. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा या बायोपिक करणार असून अभिनेत्री क्रिती सॅनॉन यामध्ये मधुबालाच्या भूमिका साकारणार असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण मधुबाला यांच्या बहिण मधुर ब्रीज भूषण यांनी या सगळ्या चर्चा खोडून काढल्या होत्या. तसेच हा बायोपिक इतर कोणीही करण्याचं धाडसंही करु नये असं त्यांनी एका मुलखातीमध्ये म्हटलं होतं. पण नुकतच आलिया भट्टची निर्मिती असलेला ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जसमीत के रीन यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. तसेच मधुबाला यांची बहीण मधुर ब्रीज भूषण या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनने या चित्रपटाची घोषणा केलीये. 

दरम्यान सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत कोणत्या अभिनेत्रीला मधुबालाच्या भूमिकेत पाहायला आवडेल हे सांगितलं आहे. यामध्ये अनेकांनी आलियाला मधुबाला यांच्या भूमिकेत पाहायला आवडेल असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना कोणती अभिनेत्री मधुबालाच्या भूमिकेत पाहायला मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तसेच प्रेक्षक आता चित्रपटाची ही आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा:

ई-टेक्सटाईल पोर्टलवर मिळणार वस्त्रोद्योग योजनांचा लाभ

देशातील पहिल्या एलएनजी आधारित वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss