माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार; माधुरीचा मोठा खुलासा

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार; माधुरीचा मोठा खुलासा

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या नृत्य आणि सौंदर्याने चाहत्याने वेड लावले आहे. मागील काही वर्षात माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जगभरात सगळीकडे माधुरीचे फॅन आहेत. माधुरी दीक्षित निर्मित पंचक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता लागली आहे. तर मागील काही दिवसांपासून एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माधुरी निवडणूक लढणार असल्याची चर्चा सगळीकडे आहे. यावर तिने माझा कट्टावर खुलासा केला आहे. राजकारण ही माझी आवड नसल्याचे माधुरीने सांगिले आहे.

निवडणूक लढण्याबाबत माधुरी म्हणाले, निवडणूक लढवणे ही माझी बकेटलिस्ट नसून इतरांची आहे. प्रत्येक निवडणूकीदरम्यान मला कुठूनतरी उभे केले जाते. पण राजकारण ही माझी आवड नाही. २०२४ च्या बकेटलिस्टमध्ये ‘पंचक’ हा सिनेमा आहे. हा सिनेमा यशस्वी झाला तर आणखी सिनेमे करण्याचा उत्साह येईल. हेल्थकेअर संबंधित काम करायची आहेत, असे माधुरी दीक्षित म्हणाली. राजकारणातील माधुरीच्या एन्ट्रीबाबत तिचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) म्हणाले, रोल मॉडेल समाजाला दिशा दाखवतात. समाजात चांगल्या सुधारणा झाल्या तर भारत पहिल्या क्रमांकावर येईल. आपल्या देशातील लोक खूप हुशार आहेत. राजकारणसोडून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येतं. राजकारण हा आमचा पिंड नाही. दररोज नवीन गोष्ट शिकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकांना मदत करायला आम्हा दोघांनाही आवडते, असे श्रीराम नेने म्हणाले.

गेल्या निवडणुकीच्या काळात माधुरी पुण्यातून निवडणूक लढणार अश्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यावेळी हे सर्व खोटं असल्याचे समोर आले होते. सध्या तरी माधुरी राजकारणात एन्ट्री करणार नाही हे स्पष्ट झाले आहे. माधुरी दीक्षित ही भारतीय जनता पक्षातून राजकारणात एन्ट्री करणार अश्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या होत्या. पण आता या चर्चाना पूर्णविराम लागला आहे.

हे ही वाचा:

2024 या वर्षात आहेत भरपूर Long Weekends…, तर आताच करा फिरायला जायचे नियोजन

पुण्यातील या ठिकाणी झाला सिलेंडरचा मोठा स्फोट, एकाच वेळी फुटले १० सिलेंडर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version